जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या दोन मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणाचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राज्य बाल हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. राहुल यांनी मुलांचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग होत असल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे.बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा २०१२ नुसार या आरोपींवर गुन्हा दाखल केलेला असतानाही अशा प्रकारचा कुठलाही व्हिडीओ अथवा फोटो प्रसारित करणे गुन्हा असल्याचे बाल हक्क आयोगाने म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, एका व्हिडीओमुळे ही घटना उघडकीस आली आणि अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कारवाई झाली ही बाब महत्वाची आहे. ऑनलाईन प्रसारमाध्यमे, वृत्तवाहिन्या यांनीही या घटनेची दखल घेतली इतकेच नाही तर हा व्हिडीओ देशातील जनतेनेही प्रसारित केल्याने अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींपुढे धाक निर्माण झाला आहे, असे असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राज्य बाल हक्क आयोगाने नोटीस पाठवणे म्हणजे द्वेषापोटी राजकारण आहे का ? हा प्रश्न निर्माण होत असून तसे असेल तर राज्य बाल हक्क आयोग देशातील जनतेला नोटीस धाडणार का असा सवालही आबा बागुल यांनी केला आहे.
![...तर देशातील तमाम जनतेलाही नोटीस बजाविणार काय ? आबा बागुल यांचा सवाल](https://mymarathi.net/wp-content/uploads/2018/06/aaba.jpg)
…तर देशातील तमाम जनतेलाही नोटीस बजाविणार काय ? आबा बागुल यांचा सवाल
पुणे -अत्याचाराचा एक व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कारवाई होत असेल तर ती कौतुकाची बाब आहे मात्र कायद्याचे उल्लंघन हे कारण पुढे करून जर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राज्य बाल हक्क आयोग नोटीस पाठवीत असेल तर मग हा व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या देशातील जनतेलाही नोटिसा धाडणार का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केला असून द्वेषापोटी कदापि राजकारण नको अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.