पुणे –
बहरलेला आसमंत… सप्तसुरांची मनसोक्त उधळण… अशा वातावरणात दिवाळी संध्या अंतर्गत स्वरोत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विशेष म्हणजे ५ हजार पणत्यांच्या प्रकाशात गीत -संगीताचा हा अनोखा उत्सव रंगला.
yaachयाचवेळी सामाजिक जाणिवेतून दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या मुला -मुलींसमवेत दीपावली साजरी करताना नागरिकांनी फराळाच्या निमित्ताने एकमेकांशी संवाद साधत स्नेहबंधही जोपासले.
माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त कै. वसंतराव एकनाथराव बागुल उद्यानात आयोजित केलेल्या दिवाळी संध्या या उपक्रमाचे आयोजन केले होते या उपक्रमाचे यंदा अठरावे वर्ष होते.विद्युत रोषणाई , प्रज्वलित झालेल्या पाच हजार पणत्यांच्या प्रकाशात स्वरोत्सवाअंतर्गत स प्तसुरांची मनसोक्त उधळण झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गीत -संगीताच्या उत्सवात ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्या प्रमुख उपस्थितीत ऋषिकेश रानडे ,आर्या आंबेकर , दीपिका जोग-दातार , सरन कुलकर्णी दर्शना जोग यांनी सादर केलेल्या गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वन्समोअरचा गजरही केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार , माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल , अमित बागुल, नंदकुमार बानगुडे , हेमंत बागुल , अभिषेक बागुल , इम्तियाज तांबोळी , विजय बिबवे, सागर आरोळे, अमर ससाणे , राजू पोळ , संतोष पवार , धनंजय कांबळे यांनी ममता फाउंडेशनमधील अनाथ आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या मुला -मुलींसमवेत दिवाळी साजरी केली. भेटवस्तू ,फराळ आणि संगीताच्या मैफिलीत विशेष निमंत्रित म्हणून ही मुले हरखून गेली होती. पर्यावरण जपण्यासाठी फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केले. संगीताच्या मैफिलीनंतर फराळाच्या कार्यक्रमात नागरिकांनी आबा बागुल यांच्याशी मनसोक्त संवाद साधला.


