अभ्यंगस्नान, औक्षण… नवे पोशाख, फराळ ;’ ते’ भारावले,’त्यांच्या’ही आयुष्यात उजळली दीपावली !
माजी उपमहापौर आबा बागुल यांचा उपक्रम
पुणे-
‘त्यांचा ‘ रोजचा दिवस हा पोटाची खळगी भरण्यासाठीच;पण गुरुवारची सकाळ मात्र त्यांना सुखद धक्का देणारी ठरली. सर्वत्र दिवाळीचे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असताना ‘त्यांच्या’ आयुष्यात प्रथमच दीपावलीच्या आनंदाची , अभ्यंगस्नानाची , नवे पोशाख परिधान करण्याची , गोड-धोड फराळाची पहाट उजाडली आणि ‘ते’ या आनंददायी वातारणात हरखून गेले.
निमित्त होते, माजी उपमहापौर आबा बागुल आणि मित्रपरिवारातर्फे गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या उपेक्षित -वंचितांसाठी दिवाळी या उपक्रमाचे.गुरुवारी दि. २७ ऑकटोबर रोजी शंकरशेठ रस्त्यावरील रेल्वे ऑफिसशेजारी पदपथावर राहणाऱ्या कुटुंबियांच्या आयुष्यातही दिवाळीचा आनंद मिळावा यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल . पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, अमित बागुल आणि शाम काळे , बाबालाल पोकळे , हेमंत बागुल ,महेश ढवळे ,इम्तियाज तांबोळी , विजय बिबवे हे सहकार्यांसमवेत सकाळी -सकाळी पोहचले. रोजचा दिवस पोटाची खळगी भरण्यासाठी लगबगीत असलेले ‘ती’ कुटुंब थोडीशी धास्तावली ;पण आपल्यासह आपल्या कच्चा -बच्चांसाठी ही माणसं दिवाळीचा आनंद देण्यासाठी आल्याचे समजताच ‘ते’ गहिवरले. लागलीच उपमहापौर आबा बागुल , जयश्री बागुल , अमित बागुल, अभिषेक बागुल यांच्यासह सागर आरोळे, अमर ससाणे , राजू पोळ , संतोष पवार , धनंजय कांबळे आणि कार्यकर्त्यांनी लहान मुलांना शास्त्रोक्त पद्धतीने पाटावर बसवून तेल , उटणे लावून अंघोळ घातली आणि औक्षण करून नवे पोशाख त्यांना घातले. फराळासह फटाके मिळाल्याने ती मुले आनंदाने हरखून गेली होती आणि त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत असल्याचे चित्र होते तर रस्त्यावरून जाणारे हे दृश्य पाहून आपणही वंचितांसाठी काहीतरी केले पाहिजे या भावना व्यक्त करतानाच या उपक्रमाचे स्वागत करून मार्गस्त होत होती. एकूण ५५ कुटुंबानी या अनोख्या दिवाळीचा आनंद अनुभवला.
उपेक्षितांच्या आयुष्यातही सेलिब्रेशन हवे ; आबा बागुल
पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो कुटुंबे दीन जगणं जगत आहेत. त्यांच्या पदरी आलेलं हे जगणं पाहून मन हेलावतं. त्यामुळे दिवाळीचा आनंद या कुटुंबाना मिळावा या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवित असल्याचे माजी उपहापौर आबा बागुल यांनी सांगितले.
ते म्हणाले, पदपथावर राहणाऱ्या या व्यक्तींच्या , कुटुंबाच्या जीवनात आनंदाचे क्षण यावे यासाठी सर्वांनी असे उपक्रम राबिण्याची नितांत गरज आहे.