आबा बागुल यांच्यातर्फे रंगपंचमीचा विशेष उपक्रम
पुणे आई -वडिलाविना पोरकी ;पण जन्मदात्यांमुळे दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या ‘त्या ‘ मुला -मुलींना सोमवारी रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटताना आपल्याला दुर्धर आजार आहे ,याचा काही क्षण त्यांना विसरही पडला आणि जीवन हे आनंदमय आहे याचा अनुभवही त्यांनी घेतला.
माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकारातून संयोजक अमित बागुल यांनी येवलेवाडी -कात्रज येथील ममता फाऊन्डेशन येथील एड्सग्रस्त मुलांमुलींसाठी दरवर्षी प्रमाणे विशेष रंगपंचमी उपक्रमाचे आयोजन केले होते. यंदाच्या सहाव्या वर्षीच्या या उपक्रमात दरवर्षीप्रमाणे या मुलांच्या आश्रमासाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा टॅंकरचा शुभारंभही यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कात्रज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड , ममता फाऊंडेशनच्या संचालक शिल्पा बुरुख , अमर बुरुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या मुलांसमवेत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी रंगपंचमी खेळून पर्यावरण पूरक आणि नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास पाण्याचा नाहक होणारा अपव्यव टाळता येऊ शकतो हा संदेशही दिला. याप्रसंगी आबा बागुल म्हणाले आई -वडिलाविना पोरकी ;पण जन्मदात्यांमुळे दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या ‘त्या ‘ मुला -मुलींना आपण कधीपर्यंत जीवन जगू हेही माहित नाही. आज आहेत ,तर उद्या नाहीत ,अशी त्यांची स्थिती आहे . असो नशिबात आहे ते जीवन आनंदाने जगावे आणि त्यांची इच्छा पूर्ण व्हावी या उद्दात्त हेतूने आम्ही या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करीत असतो. वाढदिवसानिमित्त हवाई सफर , ख्रिसमस , दिवाळी पहाट आदी विविध सण या मुलांसमवेत साजरे करून त्यांचा आनंद द्विगुणित करताना आमच्यासाठी समाज आहे ही भावना त्या मुला -मुलींमध्ये दृढ व्हावी आणि दुर्धर आजार विसरून उरले -सुरले आयुष्य आनंदाने जगावे किंबहुना त्यांचे आयुष्य वाढावे यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असून समाजातील सर्वच घटकांनी तो व्यापक करावा हा हेतू असल्याचे आबा बागुल यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी दिलीप जगताप ,अमित बागुल , नंदकुमार बानगुडे,सागर आरोळे ,संतोष मेहता., संतोष गेळे , महेश ढवळे , विजय बिबवे ,संतोष पवार, धनंजय कांबळे,हरीश यादव , गोरख मरळ, व सहकारी व सर्व बालचांमुनी आनंदाने होळीचा सण साजरा केला .


