दहशतवादी हल्ला धमकी प्रकरणी एका संशयिताला विरारमधून अटक

Date:

मुंबई-मुंबईत 26/11 सारख्या हल्ल्याची धमकी देणारे संदेश मुंबई पोलिसांना पाकिस्तान कोड असलेल्या फोन नंबरवरून आले होते, असे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी सांगितले. तसेच त्यांनी आम्ही सगळी काळजी घेतली असून लवकरच याची चौकशी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.पत्रकार परिषद झाल्यानंतर तासाभराच्या आत मुंबई पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. विरारमधील एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुंबई गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संशयित व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेली व्यक्ती उत्तरप्रदेशातली असल्याचे समजते.

मुंबई पोलिसांची स्निफर डॉग च्या मदतीने शनिवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर गस्त .

भारतात 6 जण कार्यरत?

पोलिसांना शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या एका क्रमांकावरून यासंबंधीचा एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मिळाला होता. त्यात मुंबईत धमाका करण्याचा व यासाठी भारतात 6 जण कार्यरत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या हेल्पलाइन क्रमांकावर अनेक धमकीचे मजकूर प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली. देण्यात आलेल्या मॅसेजमध्ये हल्ला करून शहर उडवले जाईल असा मॅसेज देण्यात आला होता. त्यांनंतर आयुक्त फणसळकर यांनी सांगितले की मुंबईला 26/11 हल्ल्या सारखे उडवण्याचे धमकीचे संदेश पाकिस्तान कोड असलेल्या नंबरवरून आले होते. त्यामुळे पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. आम्ही सगळे संदेश गांभीर्याने घेतले आहेत. धमकीच्या संदेशांची चौकशी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. आम्ही किनारपट्टीच्या सुरक्षेबाबत सतर्क आहोत आणि तटरक्षक दलाशी समन्वय साधत आहोत असेही त्यांनी जाहीर केले आहे.

अनेक धमकीचे मॅसेज

शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या हेल्पलाइन क्रमांकावर अनेक धमकीचे मजकूर प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. देण्यात आलेल्या मॅसेजमध्ये हल्ला करुन शहर उडवले जाईल असा मॅसेज दिला होता. फणसळकर यांनी सांगितले की मुंबईला 26/11 हल्ल्या सारखे उडवण्याचे धमकीचे संदेश पाकिस्तान कोड असलेल्या नंबरवरून आले होते. त्यामुळे पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. आम्ही सगळे संदेश गांभीर्याने घेतले आहेत. धमकीच्या संदेशांची चौकशी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. आम्ही किनारपट्टीच्या सुरक्षेबाबत सतर्क आहोत आणि तटरक्षक दलाशी समन्वय साधत आहोत असेही त्यांनी जाहीर केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...

पत्रकार विक्रांत आढाव यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध क्रीडा पत्रकार विक्रांत आढाव...