कसब्याचा गड,आणि तमाम पुण्याच्या राजकारणात धडधड; भरविणारे हे व्यक्तीमत्व आज3 सप्टेंबर 2022 रोजी 73 व्या वर्षात पदार्पण करीत आहे,1974 पासून राजकारणात आलेले बापट तीन टर्म कसब्यात नगरसेवक आणि 5 टर्म आमदार,आणि 2019 मध्ये पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले,कधीही फ्लेक्स बाजी ,जाहिरात,वर्गण्या न देणारा लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असलेलं हे व्यक्तिमत्व. जे आताच्या राजकारणात अत्यंत दुर्मीळ असलं तरी अजूनही त्यांचा राजकारणातला दबदबा तसाच दबंग आहे, मी पत्रकारितेत आल्यापासून पाहत आलेलं हे वादळ आजही पुण्याच्या राजकारणात तेवढ्याच ताकदीनं घोंगावतं आहे.. त्यांच्या कारकिर्दीला सलाम करत, त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना भरभक्कम आरोग्यसंपदा लाभो हीच आज त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा
माझा सुरुवातीचा काळ जो होता ,तो चंद्रशेखर , जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील युक्रांदचे ,अहमदनगरचे आमदार डॉ. कुमार सप्तर्षी ,पुण्याचे विठ्ठल तुपे , राम कांबळे, चंद्रकांत कांबळे ,बुवा नलावडे,सदानंद शेट्टी या जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होता, पण महापालिकेचे वार्तांकन सुरु झाले आणि बापट साहेब ,राम कांबळे यांच्याशी माझा कायम संपर्क निर्माण झाला .त्यांच्यातील अभ्यासू पणा आणि प्रचंड हुशारी ने आपले म्हणणे मांडणे, विशेतः त्यामगे असलेली त्यांची खरी तळमळ आणि त्या तळमळीने निर्माण झालेली त्यांची ताकद यामुळे त्यांचा मझा संपर्क घानिष्ठ्च होत गेला. त्या काळातील राजकारण, पत्रकारिता आणि आजचे राजकारण ,पत्रकारिता यात जमीन आसमान चा फरक आहे.जुन्या पुण्यातही समस्या होत्याच .पण जुन्या पुण्यात सौंदर्य होते, मान सन्मान होता ,प्रतिष्ठा होती ..आणि ती विशेषतः सत्ता आणि संपत्तीच्या मागे धावणारी नव्हती . राजकारण हे जवळ जवळ समाजकारण च होते. आणि पत्रकारिता हि देखिल समाजाभिमुख होती . कुटुंबाच्या चरितार्थासाठी असलेला व्यवसाय आणि राजकारण या दोन्ही गोष्टी संपूर्णतः राजकारणात अलिप्त होत्या .पत्रकार हा नेहमीच फाटका असायचा , त्याची वस्त्रे विरलेली असली तरी त्याचा मान सन्मान सर्वच स्तरावर काही औरच होता. बापट १९७३ पासून टेल्कोमध्ये मटेरिअल असिस्टट म्हणून कामगार होते.त्यावेळी अनेक कार्यकर्ते हे पिंपरी चिंचवड परिसरातील एमआयडीसी मधील कुठल्या ना कुठल्या कारखान्यात काम करत . आणि तेथून परतल्यावर पुण्यातल्या समाजकारणाचे गाडे मोठ्या हौसेने वाहत . त्यातून त्यांनी प्रतिष्ठा मिळविली. बापट त्यात सर्वात आघाडीवर राहिले राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा आजही मोठा दबदबा आहे. गिरीश बापट साहेबांचा यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर .तेतेल्कोत नौकरीला लागले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये १९ महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला.टेल्कोत असताना त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढा दिला होता. आपल्या परिचयातील कार्यकर्त्यांशी अतिशय जवळून संबंध ठेवणारा नेता म्हणून बापट सर्वश्रुत झाले होते .आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले.त्यांच्या नगरसेवक होण्याचा अभिमान तेव्हा टेल्कोला हि होता. जेव्हा जेव्हा महापालिकेची मुख्य सभा असत किंवा , काही बैठका असत तेव्हा टेल्को त्यांना आपल्या खास बाबीतून सुट्टी देऊन पाठवत .महापालिकेचे सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.१९९५ मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन् पुढे सलग २०१४ पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. १९९६ साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट साहेबांचा यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. २०१४ मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, २०१९ मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ३,२४,९६५ मतांनी पराभव केला.दांडगा जनसंपर्क आणि सर्वपक्षीय कनेक्शन गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांना उत्तम अवगत होते आणि आहे. दांडगा लोकसंपर्क हे गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जाते. सगळयांशी मिसळून राहण्याच्या वृत्तीमुळे गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास नेहमीच सुकर झाला.शहराच्या विकासासाठी ते अत्यंत जागरुक असतात . आपल्या आयुष्यातील सर्वाधिक वेळ कुटूंबापेक्षा आपल्या परिसराच्या विकासासाठी काय करता येईल यात ते घालवतात.बापट राजकारणाला कधीही व्यावसायिक स्वरुप दिले नाही . ना संपत्ती कमी झाली ना वाढली. आज ही ते कसबा पेठीतील आपल्या फ्लॅट वर वास्तव्यास आहेत . राजकारणासमवेत उत्तम व्यवहार कसा असतो हे सांगताना त्यांनी केलेली ३८ वर्षे टेल्को मधली नोकरीं सर्व प्रथम आठवते .स्पष्टवक्ते हा एक कमालीचा विशेष गुण साहेबांकडे आहे एखादे काम होणार असेल तरच थेट ते हो किंवा नसेल होणार तर नाही म्हणून सांगून मोकळे होतात .आजवर ते अनेकांचे रक्षण व पालनकर्ते झाले मात्र कधी त्यांनी केलेल्या कामाची फ्लेक्सबाजी अथवा पेपरबाजी केली नाही. कित्येक रिक्षाचालक , स्टॉल धारक, बांधकाम मजूर यांना ते आपलेसे वाटतात कारण कोणत्याही समस्या अथवा अडचणीत बापट साहेब जणू विघ्नहर्ता म्हणून पाठीशी सदैव उभे असतात.साधी राहणी उच्च विचारसरणी हे कोणाला लागू होत असेल तर ते बापट साहेब. आजही अनेकदा सुक्टरवर फिरणारा नेता म्हणून त्यांचा परिचय लोकांना आहे.कसबा पेठ गणपती उत्सवाचे ते अनेक वर्ष प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहे. आर्ट ऑफ लिविंग च्या अनेक उपक्रमांना साहेब नेहमी उपस्थित असतात. वारकरी संप्रदायाशी देखील त्यांचे अतूट नाते आहे . अध्यात्माने माणसाचे जीवन उन्नत होते अशी बापट साहेबांची धारणा आहे .
पुढाऱ्याने आपला वाढदिवस काय साजरा करावा ?
मुळातच वाढ दिवस फक्त लहान मुलांचे साजरे करावेत या धारणे तील बापट साहेब यांनी कधीही स्वतःच्या वाढदिवसाच्या जाहिराती माध्यमांना दिल्या नाहीत,ना कुठे फ्लेक्स बाजी केली. आणि त्यांची हि भूमिका सर्वपरिचित असल्याने कोणत्याही माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याकडे अशा प्रकारे जाहिराती मागण्याचे धारिष्ट्य देखील केलेले नसावे. अनेक मंडळांना वर्गण्या देऊन त्यांना सांभाळण्याचे काम आज काल नगरसेवक मंडळींना करावे लागते पण बापटांनी कधीही कुठल्या मंडळाला वर्गणी दिली असेल असे मला तरी वाटत नाही . पण त्यांनी अशा मंडळांच्या साह्याने लोकोपयोगी कामासाठी ,जसे व्यायाम शाळा ,समाजाच्या हिताच्या कार्यक्रमासाठी समाज मंदिरे मात्र उभारली .वृद्धाश्रम, मतीमंद मुलांच्या शाळा ,अंध अपंग मंडळी, गो शाळा यांना भेटी देऊन आपल्या परीने किंवा आपल्या जनप्रतिनिधी म्हणून असलेलेया निधीतून त्यांना काही न काही मदती पुरविण्याचे मात्र काम केले .
नियोजन बद्ध विकासासाठी महापालिकेच्या मुख्य सभेतला दणदणाटी..गडगडाट
प्रमोद जोग , मल्हार अरणकल्ले ,ताहेर शेख , सुधीर भोंगळे जयंत विध्वंस , विकास वाळूंजकर,अनंत पाटणकर ,प्रभू देसाई ,गोपाळराव पटवर्धन, मुकुंद संगोराम, हरीश केची अशा अनेक जुन्या ज्येष्ठ पत्रकारांनी ‘त्या ‘ काळातल्या महापालिकेच्या मुख्य सभांचे वार्तांकन केलेले आहे. मुख्य सभा बापट आणि गोगावले कशी दणाणून सोडत हे या सर्वांना ठाऊक आहे , जुन्या पुण्यात वृक्षवल्ली होती , निसर्ग संपदा होती तेव्हा जे काही नागरिक होत्या ,त्यांच्या साठी समस्याही होत्या .त्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्ता होता , बापटसाहेब तेव्हा विहिरींचे जतन करणे त्यांना जाळ्या बसविण्याचे काम करणे ,प्लास्टर करणे अशी कामे करत .वाडे वस्त्या आणि घर घरातून बापटांना कोणी ओळखत नाही असे कोणी नव्हते .नोएडा तील ट्वीन टावर पाडले तशी दहशत हवीच , नागरी शिस्त हवीच या मताचे बापट साहेब यांनी अनेकदा पुण्याचा विकास नियोजन बद्ध व्हयला हवा होता असे म्हटलेले आहे . खेडोपाडी तरुणाईच्या हातला काम न उरल्याने शहरे फुगता फुगता बकाल होऊ नयेत म्हणून शहराबाहेरच्या परिसराचे नियोजन करण्याचे काम राज्य सरकार आणि महापालिका यांनी काम सुरु केले तर २० वर्षात नियोजन बद्ध शहर निर्मिती होऊ शकते . पण राज्यातले सरकार त्यांचे शहराभोवतालचे कोंडाळे , महापालिकांची भूमिका यामुळे शहरे नुसतीच वाढतात आणि त्याबरोबर त्याच पटीने समस्याही वाढतात . बापट साहेबांनी नगरसेवक पदाच्या कारीकीर्दीत नियोजन बद्ध शहराच्या निर्मितीसाठी महापालिकेच्या मुख्य सभा कायम दणाणून सोडल्या . त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी त्यांना त्यावेळी साथ दिली . पण अजूनही त्यांच्या मनातले मुळ पुण्याबाहेरचे नियोजन बद्ध शहर निर्माण झाले आहे असे वाटत नाही