कीर्तनकार ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर ; श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे रमा एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : आज परमेश्वरासाठी जपली न जाता आपल्या मतलबासाठी जपताना दिसून येत आहे .परमेश्वराचा वापर करून आपले साधून घेणारी प्रजा जन्मास आली आहे. परमेश्वराला अपेक्षित असणारी निरागसता, निष्पापता, निष्कपटता, निर्मळता कोठेतरी परमेश्वरभक्तीत लोप पावताना दिसत आहे. परमेश्वराला निर्मळ अंत:करणाने केलेला एक नमस्कार व सर्व करता करविता तूच आहेस हे उमजून त्याचे चरणी झुकलेले मस्तकच त्याला अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर यांनी व्यक्त केले.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात पुत्रदा एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
हर्षदबुवा जोगळेकर म्हणाले, आज समस्त प्राणीमात्र जर कशासाठी प्रयत्नशील असतील, तर ती आपली भूक भागविण्यासाठी . त्यासाठी हर त-हेचे प्रयत्न ते करीत असतात. मग ते तत्वात, धर्मात, शास्त्रात बसोत अगर नसोत, त्याला आपली भूक भागली म्हणजे बास. या भुकेपाई अनंत व्याधीं जडल्या तरी, तो ती भूक भागवण्याचे प्रयत्न सोडत नाही. शेवटी त्याचा त्यात बळी जातो .
ते पुढे म्हणाले, मानवांचे तीन स्तर विचारात घेतले जातात, सामान्य माणूस, संत आणि भगवंत. भुकेने कोणालाच नाही सोडले, परिणामी भूक न भागल्यास या व्याधींना सर्वांनाच सामोर जावे लागते. सामान्य माणसास खाण्याची व वासनांच्या तृप्ततेची भूक, तर संतांना देव भेटीची भूक, तशी देवाला भावनांच्या पुर्ततेची भूक असते. त्यामुळे देवाला तुम्ही काय देता, किती देता, केव्हा देता, कुठे देता यापेक्षा कसे देता व कोणत्या भावनेने याला खूप महत्व आहे, असेही त्यांनी सांगितले.
परमेश्वराला निर्मळ अंत:करणाने केलेला नमस्कार पुरेसा
Date: