पुणे-चिदानंद प्रतिष्ठान वारजे ,माजी नगरसेविका वृषाली चौधरी आयोजित भव्य दत्त जयंती सोहळा 2022 मोठ्या उत्साहात पार पडला.या किर्तन सोहळ्यात हभप ज्ञानेश्वर महाराज पाटील यांचे किर्तन , प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज विषयावर व्याख्यान, हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन, तसेच दत्तजन्माचे कीर्तन हभप बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे झाले.
चिदानंद प्रतिष्ठानचा पुणे शहरात सर्वात भव्य दिव्य सोहळा अशी ओळख असून, प्रतिष्ठानचे हे 29 वे वर्षी असून यावर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंदिराचा नव्याने जिर्णोद्धार करण्यात आलेला आहे.काळ्या दगडामध्ये मंदिराची नव्याने स्थापना करण्यात आली आहे.श्री दत्तजयंती निमित्ताने सकाळी श्री दत्त याग, सायंकाळी 6 वा दत्त जन्माचा पाळण्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर 7 ते 9 किर्तन झाले. नऊ ते बारा यावेळी सुमारे 10,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . या कीर्तन सोहळ्यासाठी 4 दिवसांत सुमारे 18000 ते 20000 नागरिकांचा महापूर भक्तीरसात न्हाऊन गेला होता.
आपली संस्कृती, धर्म , वारकरी परंपरा टिकली पाहिजे, समाजामध्ये साधू संतांचे विचार रुजले पाहिजेत, नवी पिढी आधुनिकतेकडे जात असतानाच धर्म, संस्कृती, साधुसंत त्यांचे विचार हे ज्ञात असले पाहिजे. समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनीता आपलेपणाचा अभाव हा दूर झाला पाहिजे. या हेतूने दरवर्षी चिदानंद प्रतिष्ठान समाज प्रबोधन जागृतीसाठी कीर्तन , प्रवचन, व्याख्यानाचे आयोजन करत असते.

या किर्तन सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार भीमराव तापकीर, दौंडचे आमदार राहुल कुल, सुशील मेंगडे , दिलीप बराटे , सचिन दोडके, संदीप जर्हाड , उज्वल केसकर, सचिन मोरे, बाबा धुमाळ, विकास दांगट, अमोल नलावडे, मदन शेलार , प्रदिप कंद, तुषार पाटील, बाळासाहेब मोकाशी, माणिक मोकाशी, बापू मेंगडे , विठ्ठल बराटे,पोपट बराटे, स्वानंद महाराज वनवे, हभप चंद्रकांत महाराज वांजळे, मंगला मंत्री, दिपाली धुमाळ, अल्पना वरपे ,राणी भोसले, रूपाली धाडवे ,राजश्री नवले, माधुरी सहस्त्रबुद्धे मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड , वासंती जाधव, छाया मारणे, सायली वांजळे, स्वाती मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका सौ. वृषाली दत्तात्रय चौधरी , चंद्रकांत चौधरी यांनी केले होते . सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर, चंद्रकांत पंडित यांनी केले.

