खुन्यांना पाठीशी घालणारं सरकार सचिन वाझेंना पाठीशी घालून पुरावे नष्ट करण्याची संधी सरकार देतंय का?– प्रविण दरेकर

Date:

मुंबई दि. १० मार्च – सचिन वाझेंनीच माझ्या पतीचा खून केल्याचा थेट आरोप मनसूख हिरेन यांच्या पत्नी विमला मनसुख यांनी पत्राव्दारे केला असून वाझेंविरोधात सकृतदर्शनी भक्कम पुरावे असतानाही ठाकरे सरकार खुन्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी केला.

विरोधी पक्षाने कायदा व सुवयवसा या विषयावर नियम 260 अन्वये दिलेल्या प्रस्तावावर गृह मंत्री अनिल देशमुख विधान परिषदेत उत्तर देत असताना हरकतीचा मुद्दा उपस्थित करुन दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली. दरेकरांनी असेही सांगितले की, ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीविषयी संशय व्यक्त केला जातोय, पूजा चव्हाण प्रकरणातही ठाकरे सरकारने 20 दिवस एफआयआर दाखल करून घेतला नाही, त्यातही असाच वेळकाढूपणा केला, अरुण राठोड आजही गायब आहे, हॉस्पिटलमध्ये भरती झालेली पूजा अरुण राठोड कोण आहे, याचाही अजून पत्ता लागलेला नाही, लॅपटॉपमधील पुरावेही गायब करण्यात आलेले आहेत, पुरावे नष्ट झाल्यानंतर संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला.

हिरेन मनसुख प्रकरणातही ठाकरे सरकार असाच वेळकाढूपणा करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे का, असा संशय माझ्यासारख्या व्यक्तीला वाटत असून महाराष्ट्राची जनतेच्या मनातही हेच प्रश्न आहेत, महाराष्ट्रात खुलेआम हत्या होत असून राज्यातील जनतेचा या महाविकास आघाडी सरकारवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे सकृतदर्शनी पुरावे असलेल्या सचिन वाझेंना तत्काळ अटक करा, अशी मागणी दरेकरांनी केली. याच गोंधळात विधान परिषदेची विशेष बैठक स्थगित करण्यात आली, त्यानंतर सभागृहाची नियमित बैठक् सुरु झाल्यानंतर दरेकरांनी तीच मागणी पुन्हा लावून धरल्याने प्रश्नोत्तराचा तास देखील स्थगित करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...