आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल अर्थात शिपाई किंवा हवालदार या पदाच्या 9000 नियुक्त्या करण्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये एक खोटा संदेश पसरवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे की,अशा प्रकारची कोणतीही अधिसूचना रेल्वे सुरक्षा दलाने किंवा रेल्वे मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर जारी केली नाही किंवा कोणत्याही मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर जाहीर केली नाही.
शिपाई किंवा हवालदार या पदाच्या 9000 नियुक्त्या-ही फेक बातमी ;रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण
Date: