८२ टक्के भारतीय उच्च तणावाखाली -अमेरिका आणि भारतातील संयुक्त वेल अँड बियाँड सर्वेक्षण

Date:

मुंबई – सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स या अमेरिकेतील ग्लोबल हेल्थ सर्व्हिसेसमधील आघाडीची सिग्ना कॉर्पोरेशन (NYSE:CI) (NYSE:CI) आणि भारतातील आघाडीचे समूह असणारे टीटीके समूह व मणिपाल समूह यांच्या संयुक्त भागीदारी कंपनीने 2019 सिग्ना 360 वेल-बीइंग सर्व्हे – वेल अँड बियाँड या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आज जाहीर केले. अमेरिका, यूके, जर्मनी, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया अशा विकसित व उदयोन्मुख देशांच्या तुलनेत भारतातील ताणाचे प्रमाण उच्च आहे, असे सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. भारतातील जवळजवळ 82 टक्के लोकसंख्येला ताणाने ग्रासले आहे आणि मध्यम वयाच्या पिढीतील (वय 35-49 वर्षे) बहुसंख्य जणांना ताणाचा सामना करावा लागत असून, अंदाजे 89 टक्के जणांनी कोणता ना कोणता ताण असल्याचे नमूद केले. काम, आरोग्य व आर्थिक समस्या ही देशामध्ये ताण निर्माण करणारी प्रमुख कारणे आहेत.

यंदाचे पाचवे वर्ष असणाऱ्या सिग्ना 360 वेल-बीइंग सर्व्हेचे उद्दिष्ट शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व काम या पाच मुख्य निर्देशांकांच्या बाबतीत लोकांचा दृष्टिकोन जाणून घेणे, हे आहे. आरोग्याशी संबंधित अनेक विषयांचा समावेश करण्यात आल्याने हे सिग्नाचे आजवरचे सर्वात सर्वंकष सर्वेक्षण ठरले आहे. या वर्षीच्या सर्वेक्षणामध्ये भारतातील वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅमवर भर देण्यात आला आहे. हे प्रोग्रॅम व्यापक स्वरूपात दिसून येतात आणि अन्य ठिकाणांच्या तुलनेत त्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.

हृदयाच्या आरोग्याबाबत कमी जागृती

स्वतःच्या बॉडी मास इंडेक्सविषयी (बीएमआय) व ब्लड प्रेशरच्या आकडेवारीविषयी माहीत आहे का, असे विचारताच, हृदयाचे आरोग्य दर्शवणाऱ्या घटकांबद्दल जगभरातील सरासरीच्या तुलनेत भारतातील सहभागींमध्ये अधिक जागृती असल्याचे आढळले. 61% जणांना त्यांचा बीएमआय माहीत होता (या तुलनेत जागतिक प्रमाण 51%) व 76% जणांना त्यांचे ब्लड प्रेशर माहीत होते (या तुलनेत जागतिक प्रमाण 66%).

परंतु, हृदयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे दर्शवणारी सरासरी 2.2 लक्षणे त्यांना माहीत आहेत, तर या तुलनेत जागतिक सरासरी मात्र 2.4 आहे. यापेक्षा वाईट म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत, सर्वेक्षणातील सहभागींनी सरासरी 2.3 लक्षणे अनुभवली, या तुलनेत जागतिक सरासरी 1.8 आहे. जीवनशैलीमध्ये बदल केल्यास हाय ब्लड प्रेशर बरे होऊ शकत, हे 3 पैकी 1 व्यक्तीला वाटत नाही. यातून, हृदयाच्या आरोग्याबाबत असलेली तफावत स्पष्ट होते. हृदयाच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी व व्यवस्थापन करण्यासाठी केवळ 38% जण वेअरेबल्सचा वापर करतात.

“जीवनशैलीमध्ये बदल केल्यास हाय ब्लड प्रेशर बरे होऊ शकत, हे 3 पैकी 1 व्यक्तीला वाटत नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. कारण, या त्रासांवर उपचार न केल्यास त्यातून हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक असे गंभीर त्रास होऊ शकतात. चिंताजनक निष्कर्ष म्हणजे, गेल्या 25 वर्षांत हृदयाचे विकार व हार्ट अटॅक यांचे प्रमाण कमलीचे आहे. हृदयासाठी आरोग्यदायी ठरणाऱ्या जीवनशैलीविषयी जागृती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तेही सध्या आरोग्याचे प्रश्न असणाऱ्यांनाच नाही, तर सर्वांनीच हृदयाच्या विकारांना असलेला धोका कमी करणे व कल्याणामध्ये वाढ करणे गरजेचे आहे”, असे सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुध्य कार्यकारी अधिकारी प्रसुन सिकदर यांनी सांगितले.

मध्यम वयातील पिढीची स्थिती गंभीर

अन्य पिढ्यांच्या तुलनेत, भारतातील मध्यमवयीन पिढीने (वय 35-49) एकंदर निर्देशांकामध्ये सर्वात कमी स्कोअर नोंदवले आहेत, तसेच त्यांना त्यांच्या शारीरिक, आर्थिक व वर्क वेलनेसची चिंता आहे. यातून, या पिढीवरील ताण व ताणव यावर उपाय करण्याची गरज अधोरेखित होते.

या श्रेणीतील 89% जण ताणाचा सामना करतात, या तुलनेत तरुणांचे प्रमाण 87% आहे व 50+ वरील वयोगटाचे प्रमाण 64% आहे. परिणामी, त्यांच्यासाठी आरोग्यदायी वजन राखणे, हे एक मोठे आव्हान ठरते आणि त्यांच्यापैकी केवळ निम्म्या जणांना हे शक्य होते. या तुलनेत, तरुणांमध्ये प्रमाण 58% आहे व वयस्कर वयोगटामध्ये 55% आहे. आर्थिक स्थिती चांगली असल्याचे निम्म्यापैकी कमी जणांना वाटते. पालकांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याच्या आर्थिक क्षमतेबाबत त्यांना शंका आहे. या क्षमतेबाबत आत्मविश्वास केवळ 51% जणांना आहे. या तुलनेत तरुणांमध्ये हे प्रमाण 58% व 50+ हून अधिक वयामध्ये हे प्रमाण 62% आहे.

महिलांना हवेत टेलर्ड वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅम

जागतिक स्तरावरील निष्कर्षांच्या उलट, भारतीय महिलांपेक्षा (82%) भारतातील पुरुषांवर (85%) अधिक ताण येतो. परंतु, न हाताळण्यासारखा ताण विचारात घेता, स्त्रिया व पुरुष यांना येणारा अनुभव जवळजवळ सारखाच आहे. अन्य देशांप्रमाणेच, बहुसंख्य स्त्रियांना (87%) वाटते की वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅमने स्त्रिया व पुरुष यांच्या विशिष्ट गरजा विचारात घ्याव्यात, तर वरिष्ठ व्यवस्थापन अशा कार्यक्रमांना पाठिंबा देत नाही, असे 63% जणांना वाटते. प्रचंड काम, कुटुंबाच्या आर्थिक बाबींची चिंता व वैयक्तिक आरोग्याचे प्रश्न, हे घटक महिलांच्या ताणासाठी कारणीभूत ठरतात.

भारतातील वेलनेसची आकडेवारी तुलनेनेचांगली असली तरी वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅममध्ये आणखी सुधारणा करण्याचे अनेक मार्ग आहेत. मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे व लवचिक स्वरूपाच्या कामाची अंमलबजावणी करणे यापासून सुरुवात करून, काम करणाऱ्या महिलांचे त्यांच्या जीवनातील टप्प्याच्या दृटीने वेगळेपणे समजून घेणे आणि एकट्या महिलांच्या गरजा विवाहित व मुले असणाऱ्या महिलांपेक्षा कशा वेगळा आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.

वर्कप्लेस वेलनेस साधणे

 जगभर, केवळ 36% जणांनी वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅम असल्याचे नमूद केले आहे; भारतात 66% जणांनी असा प्रोग्रॅम असल्याचे व 56% जणांनी सहभागी होत असल्याचे म्हटले आहे. परंतु, 71% जणांना वाटते की, हे कार्यक्रम मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून केवळ शारीरिक आरोग्यावर भर देतात. 71% जणांना ताणाबाबत एम्प्लॉयरकडून पाठिंबा मिळतो, तर जगभरातील 28%च्या तुलनेत समाधानाचे प्रमाण  59% आहे (“पाठिंबा पुरेसा आहे असे त्यांना वाटते”). परंतु, अजूनही सुधारणेसाठी बराच वाव आहे. कारण, 85% काम “नेहमीच सुरू” अशा पद्धतीचे असते व 64% या जागतिक सरासरीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे.

सहभागी झालेल्यांपैकी 96% जणांच्या मते, सहकाऱ्यांच्या ताणाचा परिणाम कामाच्या ठिकाणावर झाला आहे. या तुलनेत जागतिक सरासरी 91% आहे. विशेष म्हणजे, भारतात महत्त्वाचा परिणाम सकारात्मकतेकडे झुकणारा आहे आणि जागतिक स्तरावरील चित्रापेक्षा वेगळा आहे. सहकाऱ्यांचा ताण पाहून भारतीय स्वतःच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याबाबत अधिक सावध होतात आणि एकमेकाची अधिक काळजी घेतात. जागतिक स्तरावर याउलट चित्र दिसून येते. तेथे लोकांना कामाच्या ठिकाणचे वातावरण निराशाजनक, खचवणारे व कमी उत्पादक वाटते. जागतिक स्तराच्या तुलनेत, भारतात अधिक समाधान व कमी निराशावाद असल्याने भारतातील एम्प्लॉयर योग्य कृती करत असल्याचे दिसते.

या वर्षी सिग्नाने वेल अँड बियाँड ही संकल्पना ठरवली होती. सर्वांनी वेलनेसला प्राधान्य द्यावे, यासाठी यामार्फत आवाहन करण्यात आले. सिग्नाला लोकांना त्यांच्या वेलनेसच्या प्रवासामध्ये, त्यांच्या वेलनेसविषयक गरजांचे व पर्यायांचे नियंत्रण करण्यामध्ये सबल करायचे आहे आणि आरोग्यविषयक मुद्द्यांच्या बाबतीत जागृती वाढवण्यास मदत करण्यासाठी त्यांना साधने द्यायची आहेत. संपूर्ण अहवाल वाचण्यासाठी पाहा 2019 Cigna 360 Well -Being Survey- Well and Beyond.

सिग्नाटीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडविषयी

सिग्नाटीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही अमेरिकेतील ग्लोबल हेल्थ सर्व्हिसेसमधील आघाडीची सिग्ना कॉर्पोरेशन (NYSE:CI) (NYSE:CI) आणि भारतातील आरोग्यसेवा व उच्च शिक्षण या क्षेत्रांतील आघाडीचे समूह असणारे टीटीके समूह व मणिपाल समूह यांची संयुक्त भागीदारी कंपनी आहे. आरोग्य व वेलनेस यावर भर देणारी सिग्ना टीटीके एक स्टँडअलोन कंपनी म्हणून वैयक्तिक ग्राहक, एम्प्लॉयर-कर्मचारी व नॉन-एम्प्लॉयर-कर्मचारी समूह यांच्या आरोग्यविषयक वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य, वैयक्तिक अपघात, प्रमुख आजार, रवास व ग्लोबल केअर अशी विविध प्रकारची विमा उत्पादने उपलब्ध करते.

कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून प्रमुख महानगरे व मोठी शहरे यामध्ये 19 शाखा कार्यालये आहेत. सध्या, सिग्ना टीटीकेच्या देशभरातील नेटवर्कमध्ये 20000 हून अधिक एजंट, 250+ प्रमुख ब्रोकर व 7,000 पॉइंट ऑफ सेल यांचा समावेश आहे. सिग्ना टीटीकेने आरोग्य विमा उत्पादनांचे वितरण करण्याच्या हेतूने 15 प्रमुख बँक व एनबीएफसी यांच्याशी विशेष सहयोग केला आहे. सिग्ना टीटीकेच्या ग्राहकांना भारतातील सर्व शहरांती आणि टिअर 2 व 3 शहरांतील 6500 हून अधिक विश्वासार्ह रुग्णालयांमध्ये सेवेचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी पाहा www.cignattkinsurance.in

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...