Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्थायी समितीच्या बैठकीत 43 कोटी 98 लाख रुपयांच्या खर्चास मंजूरी…..ॲड. नितीन लांडगे

Date:


पिंपरी (दि. 8 सप्टेंबर 2021)- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती व कोरोनाच्या अटकावासाठी आपत्तीजनक स्थितीचा सामना करण्याकामी औषधे आणि साहित्यांची तातडीने आवश्यकता आहे. त्यांचे खरेदीकामी येणा-या 45 लाख 1 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच कै.अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जंबो कोविड रुग्णालयातील 140 बेड आणि इतर बेड सुरु ठेवणेबाबत मुदतवाढ देण्यात आली असून त्याकामी येणा-या 1 कोटी 42 लाख इतक्या खर्चाचही मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर किमान वेतन कायदयानुसार 36 कामगार व 2 सुपरवायझर यांचे तीन महिने कालावधीकरीता येणा-या 29 लाख 47 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बुधवारी (दि. 8 सप्टेंबर) झालेल्या ऑनलाईन बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲड. नितीन लांडगे होते. या बैठकीत एकूण विविध विकास कामांसाठी येणा-या एकूण 43 कोटी 98 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 23 मधील हेडगेवार पुल ते कुणाल रेसीडेन्सी पर्यंत जाणारा 12 मीटर रुंद रस्ता विकसीत करण्याकामी येणा-या 44 लाख 20 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 27 रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणे आणि अनुषंगीक कामे करण्याकामी येणा-या 1 कोटी 92 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. टाटा मोटर्स रस्ता भोसरी ते थरमॅक्स चौक रस्ता सुशोभिकरण व मध्यदुभाजक उद्यान विषयक कामाची देखभाल करण्याकामी येणा-या 1 कोटी 22 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. ‘क’ आणि ‘ई’ क्षेत्रिय कार्यालयातील रस्ते मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभाल करण्यासाठी येणा-या 71 लाख 77 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. वैद्यकीय विभागाच्या वापराकरीता ब्लड मोबाईल कलेक्शन व्हॅनचे मनपा स्पेसीफिकेशनप्रमाणे चॅसी खरेदी करण्यासाठी येणा-या 37 लाख 10 हजार अधिक सेवाकर इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कामगार आणि कष्टकरी...

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याची परंपरा

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याचा...