३६ मीटरचा रस्ता २७ मीटर कशासाठी ? महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आंदोलन

Date:

पुणे- विकास आराखड्यात ३६ मीटर रुंदीचा रस्ता दर्शविला असताना तो २७ मीटर चाच करण्यामागे महापालिकेतील अधिकाऱ्यांचे हात भ्रष्टाचाराने माखल्याचा आरोप करीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले. इंदिरानगर चौकात पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सतिश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आंदोलन करण्यात आले . या वेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सदस्य इंदिरा ताई अहिरे, पुणे शहर सरचिटणीस कृष्णा सोनकांबळे, पर्वतीचे निरीक्षक विश्वासजी दिघे, कार्तिक, बनसोडे, जावेद शेख एजाज बारगीर, अक्षय चौतमहाल,तेजस निकाळजे,बंटी डोलारे,तोशीम बारगीर, अमोल सूर्यवंशी,स्वप्नील कर्डीले,असिफ शेख,गजानन गुडेकर, नदीम बारगीर,ताजीम शेख,नागेश राजहंस,पुरुषोत्तम पवार, संजय कांबळे,सिद्धू जळकोटे,दीपक सूर्यवंशी,तसेच सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रकरणी सतीश कांबळे यांनी सांगितलेकी, ‘बिबवेवाडी मुख्य रस्त्यावर पुणे महापालिकेच्या वतीने 2018 पासून रस्ता कॉंक्रिटीकरण चे काम चालू आहे या बाबत महा पालिकेच्या नवीन dp अनुसार 36 मीटर चा रस्ता नियोजित आहे. पण काही भ्रष्ट अधिकारी व विशिष्ट लोकांच्या आग्रहा खातिर, ठेकेदारांच्या फायद्यासाठी 27 मीटरचा रस्ता बिबवेवाडी करांच्या माथी मारला जात आहे.तसेच या चालू 27 मीटरच्या छोट्या रस्त्यामध्ये सायकल ट्रॅकची आवशकता वाटत नाही.दिवसेंदिवस बिबवेवाडी भागातील लोकवस्ती वाढत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे भविष्यात खूप मोठी वाहतूक कोंडी होऊन अपघात घडू शकतात .आणि एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार का ? तसेच पथ विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांच्यातील निष्काळजीपणामुळे व एकमेकात ताळमेळ नसल्यामुळे २४बाय ७ पाणीपुरवठा लाईन देखील काही ठिकाणी फसत आहे.आणि त्यामुळे फुटपाथ मार्ग परत खोदण्यात येणार आहे .आणि अशा गोष्टींमुळे करोडो रुपयाचे नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेला MSEDCL पावर लाईन असल्याने त्या अंडर ग्राउंड होने अपेक्षित आहे तेही पूर्ण केले नाही. अशा या अनागोंदी कामामुळे नागरिकांचा कर रुपी पैशाची उधळपट्टी होत आहे. आणि हे सर्व पाहत असताना असे वाटत कि हे सर्व जाणून बुजून तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो?. या संपूर्ण विषयाबाबत महा पालिका आयुक्त यांना गेली दोन वर्षांपासून वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही.त्यामुळे नाइलाजास्तव आंदोलन करावे लागले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रीमियम पेट्रोल ₹2.35 प्रति लिटरपर्यंत महागले: सामान्य पेट्रोल जुन्या दरानेच मिळत राहील

नवी दिल्ली- सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) स्पीड आणि पॉवरसारख्या...

लोकांमध्ये वाद निर्माण करणा-या रा. स्व. संघाच्या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच गाडून टाका: तुषार गांधी.

महाडमध्ये 'चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष' सोहळ्याचा थाटात...

राजस्थानातील नागौर येथे नवीन हरितक्षेत्र एकात्मिक सिमेंट प्रकल्पात उत्पादनाला सुरुवात

उत्तर भारतात प्रवेश करत JSW सिमेंट विस्तारत आहे आपला ठसा एकूण जोडणी ग्राइंडिंग...

अशोक खरात याच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर फरार:रुपाली पाटील-ठोंबरेंच्या आक्रमक पोस्टने खळबळ

पुणे -अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच...