पुणे-यंदा संपूर्ण महिलांची बॉक्सिंग स्पर्धा हे पुणे फेस्टिव्हल क्रीडा स्पर्धांमधील आकर्षण ठरले. शनिवार, दि. ३ सप्टे. रोजी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयम येथील वस्ताद लहुजी साळवे बॉक्सिंग सेंटर येथे ही स्पर्धा संपन्न झाली. पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महिलांची बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत ८ वयोगटात ६० महिला बॉक्सर्सचा सहभाग होता. ‘लड़की लड़ सकती है’ हे सध्या गाजत असलेले घोषवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन साठी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे आणि माजी नगरसेवक व क्रीडा समिती अध्यक्ष अविनाश बागवे यांनी याचे आयोजन केले होते. याचे बक्षीस वितरण पुणे फेस्टिवल तर्फे संयोजक रमेश बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे मदन वाणी, विजय गुजर व अन्य तीन पंच. पुणे फेस्टिव्हल चे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख काका धर्मावत आणि क्रिडा स्पर्धांचे समन्वयक प्रसन्न गोखले यावेळी उपस्थित होते.