राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोर, संजिती सहा, वेदिका अमीन यांना सुवर्णपदक

Date:

 

पुणे: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 34व्या ग्लेनमार्क सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोर, संजिती सहा, वेदिका अमीन यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 50मी बॅकस्ट्रोक मुलांच्या गटात महाराष्ट्रच्या उत्कर्ष गोरने 34.30 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.  उत्कर्ष हा दिल्ली पब्लिक स्कुल मध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून हार्मनी क्लब येथे प्रशिक्षक नरेंद्र आचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

मुलींच्या गटात 50मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या वेदीका अमिनने 36.49सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर कर्नाटकच्या समारा चाको व महाराष्ट्राच्या अपेक्षा एफ यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावले.

मुलीच्या गटात  100मी बटरफ्लाय प्रकारात महाराष्ट्रच्या संजिति शहाने 1.07.77सेकंद असा वेळ ,नोंदवत सुवर्ण पदक पचकावले तर महाराष्ट्रच्या पलक धामीने 1.08.82सेकंद वेळेसह रौप्य पदक पटकावले.

200मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या गटात   तामिळनाडूच्या शक्ती बी हीने 2.19.15सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकाले. महाराष्ट्रच्या आन्या वालाने 2.20.88सेकंद तर महाराष्ट्रच्याच अपेक्षा एफ हीने 2.21.54सेकंदासह अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

4X50 मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संजिती सहा, अपेक्षा फर्नांडीस, पलक धामी, वेदिक अमिन या संघाने 1.59.40सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले तर मुलांच्या गटात उत्कर्ष गोर, आरमान जेठा, विवान ठाकूर, रिषभ दास या महाराष्ट्राच्या संघा 2.09.55सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.

हाय बोर्ड डायव्हिंग प्रकारात मुलांच्या गटात एसएससीबीच्या सौरव देबनाथने सुवर्ण पदक मिळवले मुलींच्या गटात मध्यप्रदेशच्या भाविका पिंगळे हिने सुवर्ण पदक पटकावले. या गटातील या वर्षातील हे तिचे ६वे  सुवर्णपदक आहे. भाविका रमेश व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ऑक्टोबर मध्ये होणा-या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ती मध्यप्रदेशचे प्रतिनिधित्व करणार आहे.

स्पर्धेचे उदघाटन पुण्याचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया व स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आणि महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे, भारतीय ऑलंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी, महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:(प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार)

50मी बॅकस्ट्रोक मुले- (9ते 10 वयोगट)-1. उत्कर्ष गोर(महाराष्ट्र, 34.30 से), 2.एस. अथुबा(मणिपुर, 36.06से), 3. रिषभ दास(महाराष्ट्र, 36.19से)

 

50मी बॅकस्ट्रोक मुली- (9ते 10 वयोगट)-1. रिदिमा कुमार(कर्णाटक, 35.51से), 2. जहानबी कश्यप(आसाम, 37.04से), 3. आश्ना एएम(कर्नाटक, 37.43से)

 

50मी फ्रीस्टाईल मुले(9-10 वयोगट)-1. उत्कर्ष गोर(महाराष्ट्र, 30.55से), 2. अहमद बसीत(आसाम, 31.40से), 3. एस. अथुबा(मणिपुर 32.30से)

 

50मी फ्रीस्टाईल मुली(9-10 वयोगट)-1. जाहानबी कश्यप(आसाम, 30.88से), 2.रिदिमा कुमार(कर्नाटक, 30.91से), 3. हसिनी पी(तामिळनाडू, 32.65से)

 

50मी ब्रेसस्ट्रोक मुले(9-10 वयोगट)-1. सुराबीन रियान(त्रिपुरा, 35.06से), 2. सुरज चौहान(उत्तर प्रदेश, 35.68से), 3. रेहान मिर्झा(आसाम, 36.57से)/जशुआ थॉमस(तामिळनाडू, 36.57से)

 

50मी ब्रेसस्ट्रोक मुली(9-10 वयोगट)-1. वेदीका अमिन(महाराष्ट्र, 36.49से), 2. समारा चाको(कर्नाटक, 36.98से), 3. अपेक्षा एफ(महाराष्ट्र, 37.85से)

 

100मी बटरफ्लाय मुले(11-12 वयोगट)- 1. सोहन गांगुली(गोवा, 1.02.75से), 2. अनुभव पराशर(आसाम, 1.03.63से), 3. साहिल लष्कर(पश्चिम बंगाल, 1.03.84से)

 

100मी बटरफ्लाय मुली(11-12 वयोगट)- 1. संजिति शहा(महाराष्ट्र,1.07.77से), 2. पलक धामी(महाराष्ट्र, 1.08.82), 3. शक्ती बी(तामिळनाडू, 1.12.46से)

 

200मी फ्रीस्टाईल- मुली(11ते 12 वयोगट)- 1. शक्ती बी(तामिळनाडू, 2.19.15से), 2. आन्या वाला(महाराष्ट्र, 2.20.88से), 3. अपेक्षा एफ(महाराष्ट्र, 2.21.54से)

 

200मी फ्रीस्टाईल- मुले(11-12 वयोगट)-1. सोहन गांगुली(गोवा, 2.08.48से), 2. मयंक सोलंकी(दिल्ली, 2.15.81से), 3. कृष्णा पी(तामिळनाडू, 2.18.19से)

 

4X50 मी फ्रीस्टाईल- मुली(11-12 वयोगट)-1. संजिती सहा, अपेक्षा फर्नांडीस, पलक धामी, वेदिक अमिन(महाराष्ट्र, 1.59.40से), 2. संहिता आर, जेदिया ए, लतीशा मंदना, निना व्यंकटेश(कर्नाटक, 2.02.52से), 3. आस्था बोर्दोलोई, लवलीन दास, मनाली मिश्रा, अश्रीता गोस्वामी(आसाम, 2.05.30से)

 

4X50 मी फ्रीस्टाईल- मुली(9-10 वयोगट)-1. उत्कर्ष गोर, आरमान जेठा, विवान ठाकूर, रिषभ दास(महाराष्ट्र, 2.09.55से), 2. संस्कार भुयान, भुप्रती बुर्जोईंग, बसित अहमद, अंशुमन कश्यप(आसाम, 2.10.01से), 3. सक्षम पांवर, रॉबीन सेन, रणबिर सिंग, भाग्य गहलोत(दिल्ली, 2.14.23से)

हाय बोर्ड- मुले गट 1(16ते18 वयोगट)

  1. सौरव देबनाथ(एसएससीबी, 378.65से), 2. निहाल गिरम(महा, 269.05से), 3. दक्ष बाजपई(उत्तर प्रदेश, 254.70से)

 

मुली- 1. भाविका पिंगळे(मध्य प्रदेश 223.80), 2. आश्णा चेवली(गुजरात, 212.85), 3. मैप्रिया मित्रा(पश्चिम बंगाल 203.20)

 

स्प्रिंग बोर्ड- मुले 2(14ते 15 वयोगट)- 1. एन. विल्सन सिंग(एसएससीबी, 326.20), 2. सतिश कुमार प्रजापती(एसएससाबा, 299.75),3. ओम अवस्थि(महाराष्ट्र, 269.95)

 

मुली- 1.तितिक्षा मराठे(मध्य प्रदेश, 224.10), 2. बिल्वा गिरम(महाराष्ट्र, 200.15), 3. ईशा वाघमोडे(महाराष्ट्र, 181.35)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती गॅससाठी आता ‘ई-केवायसी’ कडे दुर्लक्ष केल्यास कनेक्शन होऊ शकते रद्द, एजन्सीत न जाता घरबसल्या अशी पूर्ण करा प्रक्रिया

मुंबई-घरगुती गॅस (LPG) वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी...

स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातूनच स्त्री सक्षमीकरण शक्य

एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव...

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....