ठाकरेंना सर्वात मोठा धक्का कोणता?:धनुष्यबाण गोठवणे, आमदार-खासदार गमावणे की भाजपची मैत्री तोडणे – अमृता फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. त्यांनी रविवारी एका ट्विटद्वारे ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का कोणता बसला? अशी विचारणा केली आहे. ‘ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का कोणता बसला? धनुष्यबाण गोठवणे, 40 आमदार व 12 खासदारांनी साथ सोडणे की भाजपची मैत्री गमावणे,’ असे त्या म्हणाल्यात.
अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडत नाही. तुम्हाला काय वाटते, पुर्वीच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का कोणता वाटतो असे म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. सत्तांतरानंतर ठाकरेंवर अनेक ट्विट आणि शाब्दीक हल्ला चढवला होता.
काय केली टीका?
तुम्हाला काय वाटते – पूर्वीच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का कोणता वाटतो?
- धनुष्यबाण चिन्हाचे नुकसान
- 40 आमदार आणि 12 खासदार गमावणे
- दीर्घकाळ निष्ठावंत युतीचा पराभव
- हिंदु पक्ष म्हणून असलेली ओळख


