२३ गावे : मुख्यमंत्री ठाकरे यांचा शाश्वत विकासाचा दूरदृष्टीपणा (लेखक:संजय मोरे )

Date:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये पुणे शहराला सर्वोत्तम महानगर तयार करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने समाविष्ट झालेले 23 गावांचा शाश्वत विकास करण्याच्या उद्दिष्टाने पीएमआरडीए चा प्रारूप विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. पुण्यातील पर्यावरण प्रेमी व तज्ञ तसेच पुणेकर नागरिकांनी या विकास आराखड्याचे स्वागत केले आहे. या आराखड्यामध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. याचेही स्वागत नागरिकांकडून होत आहे. एखाद्या भागाचा विकास करताना पर्यावरणाची हानी होईल, असे कोणतेही धोरण सदरच्या आराखड्यात दिसून येत नाही याची विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. नव्याने समाविष्ट झालेला भाग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असल्यामुळे शेती, वने, वनीकरण, हिल टॉप, ग्रीन बेल्ट, हिल स्लोप याचीही तरतूद करण्यात आली आहे. यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती (जसे की अतिवृष्टी) आल्यास याभागात त्याचा दुष्परिणाम जाणवणार नाही. तसेच पुणे महानगरपालिकेमधे समाविष्ट करण्यात आलेल्या भागामध्ये 2 रिंग रोड, दहा मेट्रो मार्गिका, हाय स्पीड रेल्वे, इत्यादी वाहतूक नियोजनासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या महानगरांमध्ये वाहतुक समस्या होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. जसे सध्या पुणे शहरामधे असलेली वाहतूक समस्या या नवीन भागात जाणवणार नाही असे योग्य नियोजन केल्याचे दिसून येते. या भागात उद्योग व व्यवसाय निर्मितीसाठी पाच पर्यटन स्थळे, पाच शैक्षणिक केंद्र करण्याचेही प्रस्तावित केले आहे. देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ हे देखील या प्रस्तावित ठिकाणी होणार असल्यामुळे जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील तसेच त्या भागातील स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील, अशा पद्धतीने सर्वसमावेशक व शाश्वत विकास हे धोरण ठेवून मुख्यमंत्री यांनी पीएमआरडीए चा प्रारूप विकास आराखडा मंजूर केलेला आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विकासाची संकल्पना व दूरदृष्टी तसेच पर्यावरण प्रेम प्रशंसनीय व पुणेकरांना भावणारे आहे. या विकास आराखड्याचे शिवसेना पुणे शहराच्या वतीने तसेच पुण्यातील जागरूक नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहोत.

संजय मोरे
(शहरप्रमुख, शिवसेना ,पुणे)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

'तारीख पे तारीख' नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा...

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा- डॉ. गोऱ्हे

बुलढाणा-बाणेर येथील विवाहितांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी व कठोर...

१० लाख रुपयांची X रे मशीन ६१ लाखांना खरेदी केली-आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात गैरव्यवहार :मनसे

मुंबई-महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी...

४ वर्षेच का मुंबई महापालिका अर्थकारणाची २५ वर्षाची चौकशी होऊ द्यात -भाजप आमदार अमित साटम

मुंबई मनपा चौकशीवरून भाजप-सपा आमने-सामनेमुंबई- महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधानसभा...