पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 18 हजार 922 :एकुण 1 हजार 666 रुग्णांचा मृत्यू

Date:

पुणे विभागातील 32 हजार 634 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 53 हजार 222 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 16 :- पुणे विभागातील 32 हजार 634 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 922 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 666 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 708 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.32 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.13 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील 44 हजार 361 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 27 हजार 700 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 478 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 453 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.44 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 2 हजार 73 रुग्ण असून 1 हजार 150 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 854 आहे. कोरोनाबाधित एकूण 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 497 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 484 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 658 आहे. कोरोना बाधित एकूण 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 776 रुग्ण असून 402 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 352 आहे. कोरोना बाधित एकूण 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 515 कोरोना बाधीत रुग्ण असून 898 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 580 आहे. कोरोना बाधित एकूण 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 24 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 515, सातारा जिल्ह्यात 124, सोलापूर जिल्ह्यात 192, सांगली जिल्ह्यात 78 तर कोल्हापूर जिल्ह्यात 115 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 70 हजार 41 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 66 हजार 395 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 646 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 12 हजार 611 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 53 हजार 222 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
( टिप :- दि. 16 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युद्धामुळे सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला:सोन्याचे दर 5 हजारांनी वाढून 1.67 लाखांवर पोहोचले

कच्चे तेल 10% वाढून 79 डॉलरवर पोहोचले मुंबई-अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे आज,...

इराण-इस्रायल युद्ध, जम्मू-काश्मिरच्या अनेक जिल्ह्यांत कर्फ्यूसदृश स्थिती,इराणमध्ये 10 हजार तर 40,000 हून अधिक भारतीय इस्त्रायलमध्ये

जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांचा जमावावर लाठीचारजम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये,...

पेहेल-२०२६ अभियानाचा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे उद्घाटन समारंभ संपन्न

शहरातील ६५० हून अधिक संकलन केंद्रांवर प्लास्टिक व ई-कचरा...

“युवा पिढी सक्षम; बदलत्या भाषेला स्वीकारा पण माणुसकी व समानतेची शिदोरी जपा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”

"शब्दांमधून विचार, विचारांमधून कृती आणि कृतीतून चारित्र्य घडते; युवकांनी...