२०२१ सालात पीएमपीच्या ताफ्यात १५० नव्या ई-बस

Date:

पुणे: केंद्र सरकारच्या फेम २ या शहरातील सार्वजनिक वाहतूकीसाठी अर्थसाह्य करणार्या योजनेतून पुण्यासाठी १५० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. महापालिका ३०० बस घेत आहे, केंद्र सरकार १५० बससाठी साह्य करत आहे, राज्य सरकारकडून मात्र काहीच मिळायला तयार नाही अशी टीका याबाबत माहिती देताना खासदार गिरीश बापट यांनी केली.

पीएमपीएलच्या मुख्यालयात खासदार बापट यांनी या खरेदीची माहिती दिली. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपील संचालक शंकर पवार, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यावेळी ऊपस्थित होते.

केंद्र सरकारने पुणेकरांना दिलेला दिलासा असे वर्णन करून बापट म्हणाले, राज्य सरकार मात्र कसली मदत करत नाही, पण आम्ही त्यांच्याकडेही मदतीची मागणी करणार आहोत. इंधनाचा कमी होत जाणारा साठा व शहरांमधील वाढते प्रदूषण यावर पर्याय म्हणून केंद्र सरकार देशातील काही शहरांंना ही मदत देत आहे. एका बसची किंमत दीड कोटी आहे. त्यातील ५५ लाख रूपये सरकार अनूदान देणार आहे. एकूण १५० बस खरेदी होतील. खासगी कंपनीकडून ही खरेदी होईल. अनूदान त्यांंना मिळणार आहे. बसचा चालक, दुरूस्ती खर्च कंपनीकडे असेल. त्या बदल्यात त्यांना ६३ रूपये ९५ पैसे प्रतिकिलोमीटर भाडे देण्यात येईल. विद्यूत खर्च पीएमपीएल करेल.

‘पीएमपी’कडून ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड यांना १५० इलेक्ट्रिक बस पुरवण्यासाठीची ऑर्डर मिळाली आहे. एव्ही ट्रान्स या 150 इलेक्ट्रिक बसेस ऑलेक्ट्रा ग्रीनटेककडून खरेदी करणार आहे.आगामी एक वर्षाच्या कालावधीत ह्या सर्व बसेस वितरीत केल्या जाणार आहे.तसेच कराराच्या कालावधीत इलेक्ट्रिक बसेसची देखभाल देखील हीच कंपनी करणार आहे.

व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी बसची तांत्रिक माहिती दिली. या बस बीआरटी मार्गावर चालवण्यात येतील. ३७ आसनक्षमता असणाऱ्या या बस संपुर्ण वातानुकुलित असतील. त्यापासून प्रदुषण होणार नाही. महापौर मोहोळ म्हणाले, बस खरेदी करण्याची मुदत संपली होती. ती वाढवून घेण्यात आली. आता करार वगैरे झाले असून एप्रिपासून बस यायला सुरूवात होईल. उपलब्घ होतील त्याप्रमाणे त्यांचा वापर करण्यात येणार आहे.

महापालिका पेठांमधील मध्यवर्ती भागात गोलाकार फिरणाऱ्या ३०० बस खरेदी करणार आहे. त्याचे दिवसभराचे तिकीट १० रूपये असेल. कोरोना आपत्तीमुळे या सगळ्या प्रक्रियेस विलंब झाला. मात्र आता प्रक्रिया पूर्ण झाली असून याही बस पीएमपीएलच्या ताफ्यात हळूहळू दाखल होतील.

* नवीन करारानुसार घेण्यात येणाऱ्या दिडशे बसमधील प्रत्येक बसही प्रतिदन २२५ किमी धावेल
* दिडशे पैकी ९० बसेस या पुणे महापालिकेच्या हद्दीत तर ६० बसेस या िपंपरी िचंचवड महापािलकेच्या हद्दीतील मार्गावर धावतील
.

* यापुर्वी २०१८-१९ मध्ये १५० ई बसेस भाडेतत्वावर घेतल्या गेल्या. यावर्षीखेर आणखी िदडशे बसेस ताफ्यात अाल्यानंतर ई बसेसची संख्या ३०० हाेणार
* १२ मीटर लांबीच्या बीआरटी ३५० ई-बसेस भाड्याने घेण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...