. दिग्दर्शकमिलिंद कवडे यांचा ‘1234’ हा आगामी मराठी चित्रपटही अनोख्या शीर्षकामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. 5 ऑगस्ट 2016रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
निर्माते कल्पेश पटेल यांच्या केपी सिनेव्हिजन आणि शैलेश पवार यांच्या शीतल फिल्म्स प्रॉडक्शन या बेनरखाली‘1234’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. अनोख्या शीर्षकाप्रमाणेच या चित्रपटाचा विषयही वेगळ आहे. निर्मातेकल्पेश पटेल आणि शैलेश पवार यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून एक साधा सोपा विचार समाजासमोर मांडण्यासाठी याचित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटात नेमकं कायपाहायला मिळेल हे शीर्षकावरून तरी लक्षात येत नाही. याबाबत सांगताना मिलिंद कवडे म्हणाले, ‘1234’च्या कथेतील खरीगंमत मोठया पडद्यावर अनुभवनं प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करणारी ठरेल. आजवर कधीही मराठी पडद्यावर न पाहिलेलंकथानक ‘1234’मध्ये पाहायला मिळेल याची खात्री देतो. सर्वच कलाकारांनी सुरेख अभिनय केल्याने शीर्षक आणिकथानकाला चार चांद लागले आहेत असं मी म्हणेन. आजवर मी नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोगांना प्राधान्य देत आलो आहे.
त्यामुळे ‘1234’ हा चित्रपट बनवताना आता काय नवीन करायचं हा प्रश्न होता, पण कथानकातच नावीन्याचा खजिनाअसल्याने मी निर्धास्त झालो. ‘1234’च्या रूपात सर्वतोपरी परिपूर्ण असा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न आमच्या टिमने केलेलाआहे. प्रेक्षकांनाही तो नक्कीच आवडेल यात शंका नाही. विशेष म्हणजे हा सिनेमा केवळ मनोरंजनाकरीता नसून त्यातमनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनही आहे, मेसेजही आहे.दिग्दर्शनासोबतच ‘1234’ची कथा-पटकथाही मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. याशिवाय सागर वानखेडेसोबतत्यांनी या चित्रपटाचं संवाद लेखनही केलं आहे. ‘1234’ या चित्रपटात भूषण प्रधान, प्रिया मराठे, संजय नार्वेकर, विजयपाटकर, गणेश यादव, यतिन कार्येकर, प्रदिप पटवर्धन, जयवंत वाडकर, विजय कदम, अरूण कदम, अनिकेत केळकर,मृणालिनी जांभळे, विशाखा सुभेदार, तेजा देवकर, संजय मोने, विजय मोरया, अभिजीत चव्हाण, किशोर चौगुले, अंशुमनविचारे, जगन्नाथ निवंगुणे, कमलेश सावंत, गुरू आनंद, प्रणव रावराणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘‘सुन्या सुन्या
ओठांचे बोल सारे…’’ हे या चित्रपटातील एकमेव गीत असून कुणाल गांजावाला आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे.गीतकार सचिन अंधारे यांनी लिहिलेलं हे गीत संगीतकार अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे. हैदराबाद येथील रामोजीफिल्मसिटीमध्ये हे गीत भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रिया मराठे यांच्यावर चित्रीत करण्यात आले असून साऊथचे कोरिओग्राफर बानू यांनी या गीताची कोरिओग्राफी केली आहे. सेन्टेनिओ टेरिझिओ यांनी या चित्रपटाच्या छायालेखनाचं
काम केलं असून कलादिग्दर्शन संदिप कुंचीकोर्वे यांनी केलं आहे. वैभव वाघ या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर आहेत, तरवैशाली देशमुख यांनी या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या कॉस्च्युम डिझायनिंगचं काम पाहिलं आहे.
‘1234’ सस्पेंस थ्रीलरपट 5 ऑगस्ट ला …
Date:

