पुणे-विठुरायाच्या जयघोषात ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या आगमनानंतर पालख्या क्रमाने मुक्कामी स्थळावर मार्गस्त होताना, शिस्तबद्ध जाणा-या ज्ञानोबांच्या पालखीला गुडलक चौकात मध्येच थांबवे लागले. यामुळे मोठा गोंधळ निर्माण होऊन ज्ञानोबांच्या पालखीला अर्ध्यातासाचा विलंब झाला .दरम्यान संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी पोलीस व वारकरी यांच्यात वाद निर्माण व्हायला कारीभूत ठरलेल्या ,आणि नंग्या तलवारी घेवून पालखीत घुसलेल्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे .
याबाबतची हकीकत अशी की, संगमपुल येथून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर पालख्या क्रमाने मुक्कामी स्थळावर मार्गस्थ होतात. प्रथम संत तुकाराम, त्यानंतर संत गब्बर शेख, संताजी महाराज जागणारे आणि संत ज्ञानेश्वर पालखी असतात. मात्र, हिंदुत्ववादी संभाजी भिडे गुरुजी संघटना मोठ-मोठ्याने घोषणा देत मध्येच घुसते. त्यामुळे ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांनी पालखी गुडलक चौकातच थांबवली. यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ येथे येऊन मध्यस्थी केली. दरम्यान, भिडे गुरुजी संघटनामधील काही व्यक्तींच्या हातामध्ये तलवारी व डोक्याला फेटे घातलेले असतात. तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे भालदार चोपदार यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांकडून यापूर्वी पोलिसांना याबाबत सांगण्यात आले होते. तसेच, तुम्हाला हे बंद करता येत नसेल, तर आम्ही आमचा मार्ग बदलू असेही सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांकडून याबाबत काहीच निर्णय घेण्यात न आल्याने यंदाही गुडलक चौकात पालखी आल्यानंतर भिडे गुरुजी संघटचे लोक पालखी त सहभागी झाले . त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रमुखांनी पालखी जागेवरच थांबवत पुढे न जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर याठिकाणी मोठा गोंधळ उडाला. वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ धाव घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वातारवण शांत झाले. तसेच ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांना यापुढे असे होऊ न देण्याची हमी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली. त्यानंतर पालखी येथून मार्गस्थ झाली. या गोंधळात तब्बल अर्धातास पालखी गुडलक चौकात थांबवण्यात आली.

