‘रॉकी हँडसम’ लवकरच … पहा ट्रेलर…
मुंबई- बॉलिवूडचा अॅक्शन स्टार जॉन अब्राहम याचा नवा अॅक्शनपट ‘रॉकी हँडसम’ लवकरच प्रदर्शित होत असून ‘ फोर्स’ चित्रपटानंतर तो पुन्हा दिग्दर्शक निशिकांत कामतसोबत काम करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासोबतच तो लवकरच साऊथमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे.
दक्षिणेतील काही दिग्दर्शक-निर्मात्यांनी या चित्रपटाचा तामिळ आणि तेलगू भाषेत रिमेक करण्यासाठी चित्रपटाचे हक्क विकत घेण्यात रस दाखवला आहे. दक्षिणेतीलच काही प्रसिद्ध स्टार्स या चित्रपटात झळकण्याची शक्यता असली तरी जॉननेही या रिमेकमध्ये काम करण्यास रस दर्शवला आहे. ‘ अॅक्शन सिक्वेन्सने भरलेला हा चित्रपट म्हणजे दक्षिणेत एन्ट्री करण्यासाठी अतिशय योग्य प्लॅटफॉर्म असल्याची जाणीव जॉनला आहे. तेथे कोणत्या प्रकारचे चित्रपट चालतात हेही जॉनला व्यवस्थित माहित असून, त्यासाठी या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणे त्याच्यासाठी उत्तम संधी असल्याचे तो जाणतो’
दरम्यान या चित्रपटात जॉन त्याच्या ‘वेलकम बॅक’ चित्रपटाची को-स्टार श्रुती हसनसोबत झळकणार आहे. जॉन यात एका ड्रग माफियाचा बदला घेताना दिसणार आहे.