पुणे- कुडकुडणाऱ्या थंडीने हुडहुडी भरणारी शुक्रवारची पहाट … कोणी कामास येईना … गस्त घालणारी पोलिसांची जिप आली अन …. एका अस्वस्थ मातेची कूस अखेर या पोलिसी मोटारीतच उजवली .
पहाटे साडेचार वाजता प्रसुतीच्या कळांनी , वेदनांनी अस्वस्थ झालेली असहाय्य गरोदर महिला तिच्या म्हाताऱ्या आईबरोबर घोरपडी पेठ येथील बस स्टाॅपवर थांबलेली असताना. म्हातारी आई येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, आज कालचा काळ ठाऊक नसे काय कुणा? कोण कधी कसे काय गोत्यात आणेल या भीतीने कोण थांबेल ? कोण धाडस करेल थांबून विचारायला .. … पहाटे च्या सुमारास त्यांच्या मदतीला कोणीही धावून येईना . नशिबाने तितक्यात गस्त घालणारी स्थानिक पोलिसांची गाडी आली आणि तिच्या किंचाळ्यांना ऐकून तिथे थांबले. आणि गुन्हेगारांच्या त्रासाने वैतागलेले-जणू कर्मठ बनलेले ते पोलीस हि थबकले .. अन त्यांच्यात असलेला माणूस जागा झाला .. तिला सरकारी वाहनातून रुग्णालयात घेऊन जात असतानाच.. तिची प्रसूती झाली आणि गाडीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पहाटेच्या थंडीत घामच फुटला. अखेर सरकारी गाडी रुग्णालयाच्या दारात पोहोचली तेथील डाॅक्टरांनी नाळ कापताच नवजात बालकाने रडण्यास सुरवात केली आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. अन … खडक पोलिसांना चांगल्या कामाचे समाधान उमगले…. अलका वैभव बालगुडे असे प्रसुती झालेल्या महिलेचे नाव आहे. तिला पहाटेच्या वेळी घोरपडी पेठ परिसरात गस्त घालणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक ए. व्ही. इप्पर, पोलीस हवालदार रत्नपारखी, आॅपरेटर पोलीस शिपाई नितीन टेटकर, पोलीस मित्र शिरीष शिंदे व नसरूल बागवान यांना या चांगल्या कामाची संधी मिळाली आणि त्यांनी हि तत्परता दाखवून स्वतः पुढे होत सहाय्य केले . याबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव . विवेक मुगळीकर तसेच उप आयुक्त तुषार दोषी , सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी आदींनी या कामाबाबत या पोलीस कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली आहे .