Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शेतकरी नेते शरद जोशी यांचं निधन

Date:

पुणे: आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढलेले  शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचं आज सकाळी 9 वाजता पुण्यातल्या राहत्या घरी निधन झालं. ते 81 वर्षांचे होते.शरद जोशी यांच्या मुली परदेशात असल्यानं त्यांच्या पार्थिवावर येत्या मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र अंत्यविधी कुठे आणि कधी करायचा याची वेळ अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे आपल्या या लाडक्या नेत्यावर प्रेम करणाऱ्यांनी लगेचच पुण्यात येण्याची घाई करु नये. असं आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आलं आहे.शेतकरी चळवळीत शरद जोशी यांचं फार मोठं योगदान होतं. 2004-2010 ते राज्यसभेचे सदस्यही होते. नाशिकच्या कांदा आंदोलनाने शरद जोशी प्रसिद्धीच्या झोतात आले आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

शरद जोशी यांचा जीवनपट
Sharad Joshi 0
जन्म – ३ सप्टेंबर १९३५
जन्मस्थान – सातारा
वडील – स्व. अनंत नारायण जोशी
आई – स्व. इंदिरा अनंत जोशी
पत्नी – लीला (१९४३ – १९८२)
कन्या – सौ. श्रेया शहाणे (कॅनडा)
, डॉ. गौरी जोशी (न्यू जर्सी, अमेरिका)
शिक्षण
प्राथमिक – रजपूत विद्यालय, बेळगाव
माध्यमिक – रुंगठा हायस्कूल, नाशिक व पार्ले-टिळक विद्यालय, विलेपार्ले (मुंबई)
एस.एस.सी – १९५१
बी.कॉम – १९५५, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
एम.कॉम – १९५७, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
सुवर्णपदक – बॅंकिंग विषयासाठी सी. रॅंडी सुवर्णपदक
आयपीएस – आयपीएस (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण, १९५८
खासदार – 2004 ते 2010 राज्यसभेचे सदस्य
व्यवसाय –
Sharad Joshi 2
कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता, १९५७-१९५८
 भारतीय टपाल सेवा, प्रथम श्रेणी अधिकारी. १९५८-१९६८ पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक सहभाग.
Chief, Informatics Servise, International Bureau, UPU
(Universal Postal Union), Bern, Switzerland 1968-1977
शेती व वर्तमानपत्रीय स्तंभलेखन १९७७ पासून आजतागायत
संघटना कार्य-
Sharad Joshi s1
मुलभूत उद्देश : व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीत कमी करणे. 
शेतकरी संघटनेची स्थापना : १९७९ ९ ऑगष्ट १९७९ रोजी चाकण येथे संघटनेच्या कार्यालयाचा शुभारंभ
१९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व, त्यासाठी उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने
 देशभरातील शेतकर्‍यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना : ३१ ऑक्टोंबर १९८२
महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने
स्त्री प्रश्नांची मांडणी-
चांदवड (जि. नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन. अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती.
 स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती
शेतकरी महिला आघाडीची स्थापना
महिलांच्या राजकीय सहभागाची योजना
महिलांच्या संपत्ती अधिकाराची फेरमांडणी
’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे, शेतकरी पुरूषांना आवाहन (१९८९). प्रतिसादस्वरूप १९९१ पर्यंत लाखांवर स्त्रियांची नावे जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर नोंदविली गेली.
दारूदुकानबंदी आंदोलन 
पंचायत राज्य बळकाव आंदोलन
संस्थात्मक कार्य
स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना (१९९४)
 देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता मांडणारा व त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा
स्वतंत्र भारत पक्षाचे खासदार (राज्यसभा) जुलै २००४ ते जुलै २०१० विशेष पदनियुक्ती
अध्यक्ष, स्थायी कृषि सल्लागार समिती, भारत सरकार (१९९० ते १९९१) कॅबिनेट दर्जा. “राष्ट्रीय कृषिनीती ” चा मसुदा
राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य १९९० पासून
 स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आयोजन समितीचे सदस्य१९९७
 अध्यक्ष, कृषिविषयक कार्यबल, भारत सरकार (सप्टेंबर २००० ते जुलै २००१). कॅबिनेट दर्जा. जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात देशाची अर्थनिती, विशेषत: कृषिनीती कशी असावी याची शिफ़ारस करणारा अहवाल
२००४ ते १० या खासदारकीच्या काळात संसदेच्या १६ विविध समित्यांचे सदस्य जागतिक स्तर
जागतिक कृषिमंच (World Agriculture forum)  सेंट लुई (अमेरिका) च्या सल्लागार मंडळाचे सदस्य १९९९ पासून.
अर्थव्यवस्था, शेतीमाल व्यापार इत्यादी विषयांवरील परिसंवाद परिषदांसाठी नियमित निमंत्रित.
लिखाण/संपादन
शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ’वारकरी’ चे संपादक व प्रमुख लेखक
’शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती, कन्नड व तेलगू भाषांतरे,
शरद जोशी यांची ग्रंथसंपदा
शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
चांदवडची शिदोरी – स्त्रियांचा प्रश्न
शेतकर्‍यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
स्वातंत्र्य का नासले?
खुल्या व्यवस्थेकडे – खुल्या मनाने
अंगारमळा(आत्मचरित्र )
जग बदलणारी पुस्तके
अन्वयार्थ – १,२
माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
बळीचे राज्य येणार आहे
अर्थ तो सांगतो पुन्हा
पोशिंद्याची लोकशाही
भारतासाठी राष्ट्रीय कृषिनीती

Arth.to_.sangato.punha_ balicherajyayenar ChandvadchiShidori

image description
image description

swatantryakanasale

इंग्रजी ग्रंथसंपदा
Answering before God
 The Women‘s Question
Bharat Eye view
Bharat Speaks Out
 Down To Earth
हिंदी ग्रंथसंपदा
समस्याए भारत की
 स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...