लाठी :संजय सुरकर दिग्दर्शित आदित्य बिडकर अभिनित पहिला चित्रपट… आज पासून चित्रपट गृहात !
आधुनिकीकरणाने कौटुंबिक मुल्यांवर होणारा आघात आणि त्यावर मात करणारा निवृत्त शिक्षक आजोबाची कहाणी सांगणारा संजय सूरकर दिग्दर्शित ‘लाठी ‘ हा बहुप्रतीक्षित मराठी सिनेमा आज सिनेमा गृहात प्रदर्शित झाला
चित्रीकरण समयी पाचवीत,आणि आज दहावीत असणाऱ्या पुण्याच्या आदित्य बिडकर ने यात सचिन खेडेकर च्या वृद्ध मित्राच्या नातवाची भूमिका केली आहे ,’लाठी ‘ मध्ये आदित्य बिडकर चे नाव आदित्य हेच आहे ,त्यामुळे आपण त्याला चार -पाच प्रसंगात ओळखू शकाल !
संजय सूरकर दिग्दर्शित अखेरचा मराठी सिनेमा ,आणि आदित्य बिड्करचा पहिला सिनेमा आहे