नारायण राणे,राणा जगजितसिंह पाटील,धनंजय महाडिक 1 सप्टेंबर ला भाजपात

Date:

मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना अखेर १ सप्टेंबर रोजी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपप्रवेशाच्या या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे.दरम्यान शिवसेनेच्या विरोधामुळे आतापर्यंत भाजपने राणेंना पक्षप्रवेश नाकारला होता. मात्र आता भाजपमध्ये इतर पक्षातून येणाऱ्या विद्यमान आमदारांची संख्या वाढल्याने या आमदारांना तिकीट देण्यासाठी भाजपने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी तर सुरु केलेली नाही ना ? असाही प्रश्न यामुळे उपस्थित केला जातोय .तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती आणि नातेवाईक माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक, सोलापुरातील काँग्रेसचे आमदार आणि एक विद्यमान खासदार या १ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
बेस्ट संयुक्त कृती समितीने सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून वडाळा डेपो येथे बेमुदत उपोषण पुकारले आहे. यावेळी कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती खालावल्याचं कळाल्यानंतर नारायण राणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला. तुम्ही येत्या १ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची आज दिवसभर चर्चा आहे. ती खरी आहे का? असा सवाल राणेंना पत्रकारांनी विचारला असता, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, असं सांगत राणेंनी येत्या रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. येत्या रविवारी राणे भाजपमध्ये प्रवेश करतानाच त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार असल्याचं सांगण्यात येतं. राणेंसोबत त्यांचे चिरंजीव नितेश आणि निलेश राणेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजते आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती आणि नातेवाईक माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक, सोलापुरातील काँग्रेसचे आमदार आणि एक विद्यमान खासदार या १ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा सोलापुरात होणार आहे. राष्ट्रवादीचेच आणखी एक नेते भास्कर जाधव आणि आमदार अवधूत तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उस्मानाबादची जागा लढवली होती. त्यात शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. ती त्यांनी फेटाळली होती. नंतर मात्र हळूहळू त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर राखण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या यात्रेला गैरहजर राहिल्यानंतर त्यांचा निर्णय स्पष्ट झाला होता.

उस्मानाबादचे भाजप नेते आणि प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पाटील हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदारपुणे :रिपब्लिकन पक्ष हा...

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...