पुणे-हिंदी दिनानिमित पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीच्यावतीने ” गुरुजनांचा सन्मान सोहळा ” नुकताच संपन्न झाला . पुणे कॅम्प भागातील आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे शाळा समिती अध्यक्ष नगरसेवक दिलीप गिरमकर ,नगरसेवक अतुल गायकवाड , प्रकाश वाजा , आरती संघवी , विपीन शहा ,शशीधर पूरम , डॉ दादा टेकवडे आदी मान्यवर , विविध शाळामधील शिक्षक वर्ग उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सयोजंक अड. अर्जुन खुर्पे , उषा माळी , कुसुम शेलार , अड. आशिष खुर्पे , योगेश खुर्पे आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी उपस्थित गुरुजनांचा शाल , श्रीफळ , भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत अड. अर्जुन खुर्पे यांनी केले तर पुस्तक पतपेढीच्या कार्याची माहिती दिलीपकुमार सराफ यांनी दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा माळी यांनी केले तर आभार सचिन चव्हाण यांनी मानले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले .