१० स्विकृत सदस्य बिनविरोध पण… दोघांचा पत्ता कट होणार काय ? रंगली चर्चा

Date:

पुणे: महापालिकेच्या दहा जागांसाठीच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड आज बुधवारी मुख्य सभेत होणार आहे, राजकीय पक्षांनी आपापल्या बलानुसार दहा उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.त्यामुळे ही निवड बिनविरोध आणि सुलभतेने होईल असे चित्र असताना दोन उमेदवारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने ते छाननीत बाद झाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्याच्या मुख्य सभेत दहाऐवजी केवळ आठच जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे.मात्र, या निवडीत आठच नगरसेवक निवडले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही निवड मुख्य सभेत होणार असताना मंगळवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडून दहा सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयात दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मुख्य सभेत आयत्यावेळी हा प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याची चर्चा आहे.
पक्षीय बलाबलानुसार महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज ९ मार्च रोजी सादर केले होती. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारांनी आपले अर्ज आयुक्तांना सादर केले होते. त्यानुसार, आयुक्तांकडून या अर्जाच्या छाननीसाठी स्वतंत्र समितीही नेमण्यात आली होती. या समितीकडून मंगळवारी अखेरपर्यंत या अर्जाची छाननी सुरू होती. महापालिका अधिनियमानुसार, सभागृह अस्तित्वात आल्यानंतर नजीकच्या पहिल्या मुख्य सभेत या सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
त्यामुळे, प्रशासनाकडून जे आठ अर्ज पात्र झाले आहेत. त्यांचीच नावे मुख्य सभेत सादर करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अर्ज बाद झालेले ते दोन उमेदवार कोण याची चर्चा रंगते आहे. नेमके खरे खोटे मात्र मुख्य सभेत हा विषय येईल तेवहच स्पष्ट होणार आहे.

भाजप चे स्विकृत सदस्य उमेदवार
प्रियंका शेंडगे
जयप्रकाश पुरोहित रवी साळवेकर विश्वास ननावरे उदय लेले राजेंद्र काकडे नीलेश कोंढाळकर

राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता धनकवडे राकेश कामठे आणि काँग्रेसचे उमेदवार सुनील शिंदे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्याचे अभिवादन

पुणे, दि.१८: स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या...

इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना दुर्घटना, 6 लोक जिवंत जळाले, 3 जण भाजले

पोलीस आयुक्त म्हणाले, "चार्जिंग पॉईंटवर स्फोट झाला, जिथून आग...

उपमहापौरपद दिले पण सन्मान दिला जात नाही; परशुराम वाडेकरांचा गजब दावा

पुणे:महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता आल्यानंतर भाजपने आरपीआयला उपमहापौरपद दिले. पण...