‘सर्वोत्कर्ष’ ट्रस्टचं शाहिर दादा कोंडके यांच्यावरचं पाहिलं – वाहिलं नाटक ‘स्वर्गात दादांची धम्माल’ हे रंगभूमीवर आले असून या नाटकाचा पहिला प्रयोग नुकताच झाला. ‘सर्वोत्कर्ष’ प्रस्तुत स्वरसुगंध निर्मित असलेले हे नाटक अभिजात कला निकेतन संस्था कोकणवासी वंचित विद्यार्थांच्या मदतीसाठी ‘स्वर्गात दादांची धम्माल’ हे दोन अंकी विनोदी नाटकाचा प्रयोग करण्यात आला होता. या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, शि. द. फडणीस, चिंटूचे निर्माते चारुहास पंडित, सर्वोत्कर्ष ट्रस्टचे राजेश दातार, चित्रपट निर्माते एम. के धुमाळ व भास्कर ताकवले आदी मान्यवर उपस्थित होते.
शाहिर दादा कोंडके यांच्यावर काल्पनिक कथेवर आधारित कल्पनारम्य दोन अंकी हे नाटक संगीत, नृत्य, विनोद, व्हिडीओग्राफी व नयनरम्य सेट असं नाटकातील सर्वच वातावरण स्वर्गातील असल्यामुळे पहिल्या प्रयोगाला रसिकांनी दाद दिली. या नाटकात देवांचा राजा इंद्रदेव त्यांच्या सबोत पापपुण्याचा हिशोब ठेवणारे चित्रगुप्त, यम, यमाचा रेडा, नारदमुनी, इंद्राचे सेवक व चार अप्सरा व त्यांची १० अप्रतिम नृत्ये असल्याने रसिकांनी मनोरंजनाची मेजवानी ठरेल असे निर्मात्यांनी सांगितले . या वेळी दादांच्या सर्व गाजलेल्या चित्रपटातील निवडक १० ते १२ तडाखेबंद नृत्य वैशिष्ट्यपूर्ण सादर केली गेली
या नाटकात सुशीलकुमार या अभिनेत्याच्या रूपाने दादा कोंडकेंना पुन्हा एखदा रंगमंचावर पाहवयास मिळाले. त्यांच्याबरोबर, भास्कर पावसकर, ज्ञानेश्वर धुमाळ, भास्कर चांदणे, प्रसाद धाकुलकर, बंडू देशमुख, माधवी पंचशील व प्रियंका पद्मजा या कलाकारांनी रंगत आणली. या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा लेखक – दिग्दर्शक – विजय जोशी यांनी सांभाळली होती. निर्मिती – संकल्पना – संगीत – व्यंकटेश गरुड, नाट्य निर्मिती सर्वोत्कर्ष ट्रस्ट व राजेश दातार यांची आहे. अभिजात कला निकेतन संस्थेच्या वतीने कोकणवासी वंचित विद्यार्थांच्या मदतीसाठी श्रीनिवास सरमुकादम यांनी या प्रयोगाचे आयोजन केले होते.
या नाटकाचा दुसरा प्रयोग १२ मार्च शनिवारी सायं. ५;३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार आहे. या नाटकाचा प्रयोगाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ पुणे यांनी केले असून तरी जास्ती जास्त पुणेकरांनी या नाटकाचा आस्वाद घ्यावा असे आवहान करण्यात आले आहे.