स्वयंसिद्धा पुरस्कार जाहीर ,रविवार १५ मार्च रोजी वितरण सोहळा – गौरी बिडकर, स्नेहा गाडगीळ ,डॉ स्नेहसुधा कुलकर्णी ,डॉ रजनी गुप्ते,डॉ गिरीजा शिंदे यांचा समावेश
पुणे :
‘ लायन्स क्लब ऑफ पुणे एलीट ‘ तर्फे दिले जाणारे ‘स्वयंसिद्धा ‘ पुरस्कार जाहीर झाले आहेत .जलतरण पटू गौरी गाडगीळ यांच्या मातुश्री स्नेहा गाडगीळ , ‘ प्रबोधन माध्यम ‘ (न्यूज एजेन्सी ) च्या संचालक गौरी बिडकर ,डॉ स्नेहसुधा कुलकर्णी ,डॉ रजनी गुप्ते ,डॉ गिरीजा शिंदे यांच्यासह एकूण १५ महिलांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ पुणे एलीट च्या वतीने व्यवस्थापकीय संचालक जयश्री पेंडसे आणि क्लब अध्यक्ष छाया पांचाळ यांनी दिली
परिस्थितीशी संघर्ष करत यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि महिलादिनानिमित्त हे पुरस्कार दिले जातात . पुरस्काराचे हे दशकपूर्ती वर्ष आहे .
सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख , ‘ पुण्यनगरी ‘ च्या संपादक राही भिडे यांच्या हस्ते आणि प्रांतपाल विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १५ मार्च २०१५ रोजी स्वानंद सभागृह ,सहकारनगर येथे सकाळी साडे दहा वाजता होणार आहे .
पुरस्कारार्थी नावे :
१. .जलतरण पटू गौरी गाडगीळ यांच्या मातुश्री स्नेहा गाडगीळ ,
२. ‘ प्रबोधन माध्यम ‘ (न्यूज एजेन्सी ) च्या संचालक गौरी बिडकर ,
३. प्रकाशक डॉ स्नेहसुधा कुलकर्णी ,
४. डॉ रजनी गुप्ते ,
५. डॉ गिरीजा शिंदे
६. छाया जाधव
७. प्राजक्ता कोळपकर
८. चैताली माजगावकर
९. रिता सेठिया
१०. प्राची लिमये – शहा
११. योगिता भगत
१२. संध्या आगरकर
१३. पद्मावती शिवगुंडे
१४. सुशीला परदेशी
१५. सारा सिधये