स्वच्छ भारत अभियानांतर्गत मांजरी येथील सिरम इन्स्टिट्युट येथे आदर पुनावाला स्वच्छ शहर अभियान व पुणे महानगरपालिका यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या संयुक्त उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, डॉ.सायरस पुनावाला आणि श्रीमती शायना एन.सी. उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, समाजाकडून आपण बरेच काही घेत असतो. त्याचप्रमाणे समाजाचे आपण देणे लागतो. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आदर पुनावाला स्वच्छ शहर उपक्रम समाजाला परत देण्याच्या विचारातूनच पुढे आला आहे. पुनावाला समुहाप्रमाणेच इतर उद्योग समूह सामाजिक संस्था आणि नागरीक मोठ्या प्रमाणावर स्वच्छ भारत उपक्रमामध्ये सहभागी झाल्यास हे अभियान यशस्वी होण्यास मदत होईल. यातून पुणे शहर देशातील पहिले स्वच्छ आणि सुंदर शहर होण्यासाठी मदत होईल. उद्योग समुहांच्या सहभागामुळे स्वच्छ भारत अभियानाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून अन्य शहरातही असे उपक्रम विविध उद्योग समुहांमार्फत राबविण्यात येतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. हा उपक्रम पुण्यासाठी महत्वाचा असून यामध्ये सुमारे 100 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीरम इन्स्टीट्युटचे आदर पुनावाला यांनी नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ शहर अभियान यशस्वी होईल, असे सांगितले. यावेळी आदर पुनावाला यांनी या उपक्रमामागची भूमिका विषद केली. यावेळी मुख्यमंत्री आणि आदर पुनावाला यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते यावेळी आदर पुनावाला स्वच्छ शहर उपक्रमांतर्गत घन कचरा प्रकियेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आली.