लोकप्रतिनिधींना लोकभावना समजत नाहीत काय ?
पुणे- स्मार्ट सिटी च्या नावाने ३००० कोटीचा प्रकल्प नागरिकांसाठी असणार आहे कि मुठभर कंपन्या आणि ठेकेदारांसाठी असणार आहे ? असा सवाल मनसे चे युवा नेते रवी सहाने यांनी केला आहे . त्यांनी स्मार्ट सिटी साठी जोरदार आग्रह करणाऱ्या माध्यमांवर कडाडून टीका केली . यांनी काय ” स्मार्ट सिटी प्रकल्पाची ” ची एजन्सी घेतलीय का – संपूर्ण देशात प्रथम राज ठाकरे यांनी यांनी स्मार्ट सिटी ची पोल खोलली आणि नंतर पुणे मनपात मनसे च्या धाडसी नगरसेवकांनी मुख्य सभेत हा विषय हाणुन पाडला यावर काही माध्यमांनी राज ठाकरे व मनसे वर टिका करण्यास सुरुवात केली .म्हणे हे दूतोंडी आहेत एकीकडे विरोध आणि नाशिक मधे बाजु घेतल्याचा आरोप करीत आहे .मुळात संबधित माध्यमांना या प्रकल्पामध्ये मधे इतका रस का आहे ?… काय या अंतर्गत येणाऱ्या कामाचे ठेके मिळणार आहेत का ..?असा सवाल करून श्री सहाने म्हणाले ,तूटपूंजी रक्कम देवून घटनेने महापालिकेला दिलेला अधिकार केंद्र सरकार काढून घेत आहे हे त्यांना नाही दिसत का?आणि लोकांनीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना लोकभावना समजत नाहीत काय , लोकभावना जर समजते तर ‘बस डे’ आणि ‘सायकल चालवा’ अभियानाचे काय झाले हे त्यांनी सांगावे .लोकभावना हि आहे कि स्वस्तात, कमी वेळेत सुलभतेने कामावर आणि घरी पोहोचत यावे . तुमच्या ‘बस डे’ ने ते शक्य झाले नाही आणि सायकल चालवा अभियानाने हि झाले नाही . म्हणून पुण्यात दुचाक्या ना प्राधान्य दिले जाते . पुणेकरांची लोकभावना हि त्यांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे त्यांना केवळ नित्यनियमाने पाणी , स्वच्छता ,सुरळीत वाहतूक हवी आहे .मुलभूत कामे जी महापालिकेने करायला हवीत त्यासाठी वृत्तपत्रांचाही अंकुश बोथट झाला कि काय ? असा सवाल हि त्यांनी केला आहे