Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘स्मार्ट खेडी’निर्मितीची देखील गरज : लतीफ मगदूम

Date:

index1

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा हिवाळी शिबीराचा समारोप

पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या (एन एस एस) वतीने 7 दिवसीय रहिवासी हिवाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर कोरेगांव भिमा ता.शिरूर जि.पुणे येथे पार पडले.  ‘स्वच्छ व स्वस्थ भारत अभिायान’ या संकल्पनेवर आधारित या हिवाळी शिबीरामध्ये एकूण 114 विद्यार्थीनींनी भाग घेतला होता.
 ‘स्वच्छ व स्वस्थ भारत अभिायान’ या संकल्पनेवर आधारित या हिवाळी शिबीरामध्ये गावामध्ये प्रभात फेरी, जैव वनस्पती सर्वेक्षण, ग्राम स्वच्छता जागृती, पाणी आडवा पाणी जिरवा, वनीकरण, सायबर क्राईम, श्रमदान, इतिहास लेखन, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, डेंग्यु आजाराबद्दल जागृती, सद्भावना रॅली, व्यक्तीमत्व विकास, मानसिक आरोग्य, गट चर्चा, पथ नाट्य आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
‘सध्या भारताच्या विभिन्न शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ची चर्चा आहे. त्या ऐवजी संपूर्ण भारतामध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ संकल्पना प्रामुख्याने राबविली गेलीे पाहिजे,कारण शहरामध्ये मानवी लोकसंख्येच्या दहापट वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. मानवी जीवनाची वयोमर्यादा कमी होत चालली आहे. म्हणून युवा पिढीने शहरातून ग्रामीण व आदिवासी भागाकडे स्थलांतर करून त्या ठिकाणी शैक्षणिक सामाजिक माध्यमातून व्यक्तीमत्व विकास घडविला पाहिजे. त्यामुळे खेडयातील सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणातूनच ‘स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान’ हा राष्ट्रीय सेवा याजनेचा उपक्रम यशस्वी होईल.’असे प्रतिपादन लतिफ मगदुम यांनी केले
             या 7 दिवसीय शिबिराचा समारोप नुकताच लतीफ मगदूम (सचिव, एम.सी.ई.सोसायटी) यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना बोलत होते.
समारोपाला प्रमूख पाहुणे म्हणून कोरोगांव भिमाचे उपसरपंच नितीन गव्हाणे व ‘अल अमीन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष नासीर शेख उपस्थित होते.
प्रास्ताविक आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्याल्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रकल्प समन्वयक प्रा. नुसरत शेख यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. शौकत खान तर आभार प्रदर्शन प्रा. मन्सुरा मुलानी यांनी केले. शिबीराचे संयोजन उपप्राचार्या डॉ.शैला बूटवाला आणि रा.से.यो. चे शिबीराचे समन्वयक डॉ.आफताब आलम व डॉ.इम्तियाझ झाहिद यांनी केले.
शिबीराचे उद्घाटन कोरेगांव भिमा ग्रामपंचायतचे सरपंच अनिता भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटनाला प्रमूख पाहुणे म्हणून डॉ. निकी मल्होत्रा (प्राचार्या, कॉलेज ऑफ कॉम्प्यूर सायन्स, वाकड) उपस्थित होत्या.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...