स्त्रियांना आनंदी ठेवू शकणारा समाज तयार व्हावा :डॉ कुमार सप्तर्षी
पुणे :
‘ समाजात अजूनही विचार शून्यतेची उपासना सुरु असताना आर्थिक सत्ता ,समाज सत्ता स्त्रियांच्या हाती देवून त्यांना आनंदी ठेवू शकणाऱ्या समाजाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे ‘ असे प्रतिपादन गांधी भवन चे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी केले .
‘ रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन ‘ च्या वतीने देण्यात येणाऱ्या , ‘ व्होकेशनल एक्सेलन्स अवार्डस ‘ वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते . रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन चे अध्यक्ष अतुल जोशी अध्यक्ष स्थानी होते
शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम वूडलेंड सोसायटी सभागृहात झाला
या कार्यक्रमात कवयित्री डॉ अरुणा ढेरे , नूतन क्षम उर्जा संशोधन क्षेत्रात कार्यरत संशोधक डॉ प्रियदर्शिनी कर्वे , ज्ञान प्रबोधिनी च्या महिला सबलीकरणासाठी कार्यरत कार्यकर्त्या सुवर्णा गोखले यांना ‘ व्होकेशनल एक्सेलन्स अवार्डस ‘ देवून गौरविण्यात आले .
यावेळी बोलताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले ,’ अनेक समाज सुधारकांनी स्त्रियांना दुष्ट चक्रातून बाहेर काढले . तरीही आर्थिक आणि सामाजिक सत्ता स्त्रियांकडे पूर्णपणे गेली नाहीत . ती सूत्रे स्त्रियांच्या हाती देणे परिवर्तनासाठी गरजेचे आहे . समाजात अजूनही विचार शून्यते ची उपासना सुरु असताना आर्थिक सत्ता ,समाज सत्ता स्त्रियांच्या हाती देवून त्यांना आनंदी ठेवू शकणाऱ्या समाजाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे
भारतीय स्त्रीचा चेहरा हा स्त्रीवादाचा चेहरा नसून परिस्थितीशी खंबीर सामना करणाऱ्या स्त्रीचा चेहरा आहे . निर्णायक क्षणी स्त्रिया स्वताचे सामर्थ्य वापरतात . तरीही स्त्रियांना अद्याप मागास ठेवण्यात आले आहे . ही विसंगती दूर करून विधायक चित्र निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी
प्रियदर्शिनी कर्वे म्हणाल्या ,’ जागतिक तापमान वाढीच्या मध्ये शहरांचा वाटा वाढत असून जीवनशैली ,उर्जास्त्रोत आणि ,तंत्रे बदलून पर्यावरण पूरक जगण्याचे परीक्षण केले पाहिजे . स्वताची ,आस्थापनांची कार्बन फुट प्रिंट तयार केली पाहिजे
सुवर्णा गोखले यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणा च्या चळवळीचे अनुभव सांगितले . महिलांमधील आर्थिक साक्षरता वाढवून त्यांचा समाजातील सन्मान वाढविणे गरजेचे आहे त्यात अनेक व्यवस्था बदलाव्या लागतील असेही त्यांनी सांगितले
डॉ सुधीर राशिंगकर ,दिलीप कुंभोजकर ,गणेश जाधव ,शुभदा ताम्हणकर ,अंजली मेहेंदळे ,प्रकाश भट इत्यादी मान्यवर उपस्थित होते