|
वर्धा : वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांना सौर ऊर्जेवरील चरख्याच्या माध्यमातून रोजगार मिळवा, कुटुंबांना आर्थिक मिळकतीचे साधन मिळावे या उद्देशाने या जिल्ह्यात सौर ऊर्जेवरील चरखे सीएसआर फंडातून देण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सेवाग्राम आश्रमात सकाळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापू कुटीमध्ये प्रार्थना करुन सूतकताई करुन महात्मा गांधीजींचे स्मरण केले. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंवत मठकर, सचिव श्रीराम जाधव, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, तहसीलदार राहुल सारंग, शिरीष गोडे यांची उपस्थिती होती. पालकमंत्री यांनी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक बळ देण्याकरिता चरख्याचे वितरण करण्यात येतील. चरख्यापासून निर्मित सूत आश्रम खरेदी करेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खादी वापराचा परिणाम म्हणून पूर्वीच्या तुलनेत खादीची मागणी 25 ते 30 टक्क्यांनी वाढली आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाने आश्रमासोबत बैठकीचे नियोजन करावे, अशी सूचना केली. प्रारंभी बापू कुटीमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रार्थना केली. त्यानंतर परिसरात करण्यात येत असलेल्या सूतकताईच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी आश्रमाच्यावतीने अध्यक्ष जयवंत मठकर यांनी सूतमाला आणि पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आश्रमाच्यावतीने अध्यक्ष जयवंत मठकर यांनी सेवाग्राम विकास आराखडा याबाबतही निवेदन दिले, तसेच त्यांनी खादी निर्मिती आणि वितरणाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चरख्यावर सूतकताई केली. तसेच महात्मा गांधीजींचे स्मरण करुन प्रार्थना म्हणून त्यांना अभिवादन केले. |
|
सौर चरख्यातून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार रोजगार – सुधीर मुनगंटीवार
Date:

