मुंबई -भारतीय बाजारपेठेत स्वस्त स्मार्टफोनचा वाढता ट्रेंड पाहून स्मार्टफोन मोबाइलमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या सॅमसंगने भारतातील गॅलक्सी स्मार्टफोनच्या किंमती आता बऱ्याच कमी करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या केलेली किंमत कपात लक्षणीय आहे भारतीय बाजारपेठेत टिकून राहावयाचे असल्यास काळाची पावले ओळखून त्यानुसार निर्णय घावे लागतात. त्यामुळेच सॅमसंगने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.
सॅमसंगने कोणताही गाजावाजा न करता गॅलक्सी स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये घट केली आहे. यामध्ये गॅलक्सी Ace NXT, गॅलक्सी स्टार अँडवांस, गॅलक्सी ग्रँण्ड नियो, गॅलक्सी S3 नियो आणि गॅलक्सी नोट ३ नियो यांचा समावेश आहे.
सॅमसंग गॅलक्सी नोट लाँचिंगच्या वेळेस या स्मार्टफोनची ३३,९०० रु. किंमत होती.आता २४,३७८ किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलक्सी ग्रँण्ड नियो हा स्मार्टफोन १८,४५० रु. किंमतीला लाँच करण्यात आला होता. आता
१३,६६८ रु. किंमतीला उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलक्सी S3 नियोची सध्याची किंमत २०,९१० रु. आहे. नियो लाँचिंगच्या वेळी याची किंमत २६,२०० रु. होती. म्हणजेच हा स्मार्टफोन जवळजवळ ५,२९० रुपयाने स्वस्त करण्यात आला आहे.
जुलैमध्ये सॅमसंग गॅलक्सी Ace NXT ७४०० रु. किंमतीला लाँच करण्यात आला होता. आता सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरवर हा स्मार्टफोन ६६२० रु. किंमतीत उपलब्ध आहे.
जुलैमध्ये सॅमसंग गॅलक्सी स्टार अँडवांस ७४०० रु. किंमतीला लाँच करण्यात आला होता. आता सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरवर हा स्मार्टफोन ६७९० रु. किंमतीत उपलब्ध आहे.