पुणे :- पुण्याच्या सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट ट्रैव्हल अन्ड टुरिझमच्या ६ विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील नामांकित हॉटेल्स मध्ये झळकले आहेत. यावर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांनी भारतासह परदेशातील इतर अनेक प्रतिष्ठित हॉटेल्स मध्ये काम करण्याची संधी मिळावली आहे.
स्वप्नील परळकर, राहुल गाडगीळ, पराग फडतरे, किरण कडू, जयदीप महाबळेश्वरकर, बेन्हूर मनतोडे ह्या सहा विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नॉर्थ मधील हॉटेल रामाडा, आंकरेज मेरिअट डाउनटाउन, आंकरेज ऐन्ड विन स्टार हॉटेल,ओक्लाहोमा सारख्या प्रसिद्ध हॉटेल्स मध्ये चांगल्या पदावर काम मिळाले असून ह्या कॉलेजने सुरवातीपासूनच आपला शंभर टक्के प्लेसमेंटचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे.