बालगंधर्व , लोकमान्य अशा सिनेमांनंतर सुबोध भावे चा ‘कट्यार काळजात घुसली ‘येतो आहे . खरे तर बराच काळ रखडला असे वाटावे अशी स्थिती असतानाच या चित्रपटाचा प्रोमो प्रकाशीत झाल्याने रसिकांच्या आशा नक्कीच पल्लवित होतील आणि दिवाळीत हा चित्रपट येईल असे आता जाहीर हि झाले आहे . गेली पन्नास वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ हे मराठी रंगभूमीवरचं सोनेरी पान चित्रपटाव्दारे रुपेरी पडदयावर साकारल जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता सुबोध भावे करत असल्यामुळे या चित्रपटाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत . शंकर महादेवन, सचिन पिळगांवकर, साक्षी तन्वर, मृण्मयी देशपांडे अशा नामांकीत कलाकारांमुळे चित्रपट वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचणार आहे. पहा या चित्रपटाचा टीझर …आणि काही फोटो …