वरिष्ठ पत्रकार जासिम खान यांनी सलमान खान याच्या जीवनावर पुस्तक लिहिले असून या पुस्तकातून सलमान याच्या जीवनावर मोठा प्रकाश झोत पडेल असे अनेकांना वाटते आहे . सलमानच्या ५० व्या वाढदिवशी म्हणजे येत्या २७ डिसेंबरला हे पुस्तक प्रकाशित होईल असे वृत्त आहे . सलमान ने का नाही केले लग्न ? सलमान का नेहमी सापडतो वादाच्या भोवऱ्यात… का वागतो असा , सलमान चे कोण कोण पूर्वज आहेत .. त्याबाबतची त्याच्या जीवनात काही महत्वपूर्ण अशी पार्श्वभूमी आहे काय ? अशा अनेक प्रश्नांवर हे पुस्तक उजेड टाकील काय ? सलमानच्या जीवनातील लोकांना ठावूक नसलेले नव नवीन पैलू या पुस्तकातून समोर येतील काय ? असे अनेक प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने निर्माण होत आहेत .