पुणे :सामाजिक युवा संघटना संघर्ष सोशल फौंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी परिसरातील सुमारे १२० महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष चैतन्य पुरंदरे, उपाध्यक्ष आशिष करकरे, सदाशिव लाळे, डॉ. हिरेन निरगुडकर , रणजित शिंदे , खुशाल पुरंदरे, सार्थक खिरे आदी उपस्थित होते. धांडे पॅथॉलोजी लॅबचे डॉ. नितिन धांडे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या उपक्रमास सिंहगड रोड परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“संघर्ष सोशल फौंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर”
Date:

