![श्री. पंडित उर्फ वसंत विष्णुपंत दामले यांचे दुःखद निधन](http://mymarathi.net/wp-content/uploads/2015/02/217-194x300.jpg)
श्री. पंडित उर्फ वसंत विष्णुपंत दामले यांचे दुःखद निधन
‘प्रभात’ फिल्म कंपनी निर्मित ‘संत तुकाराम’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटात संत तुकारामांच्या मुलाची – महादूची भूमिका सकारणारे श्री. पंडित उर्फ वसंत विष्णुपंत दामले यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने वयाच्या ८७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ‘संत तुकाराम’ बरोबरच ‘प्रभात’ च्या इतर चित्रपटांतही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. प्रभात च्या कारकीर्दीचा आढावा घेणारे ‘प्रभात समयो पातला’ या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते.
वडील श्री. विष्णुपंत दामले यांनी चित्रपट क्षेत्रातील अनिश्चितता ओळखून श्री. पंडित दामले यांना इंजिनीअरिंग चे शिक्षण दिले. इंजिनीअर झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत एअर इंडिया मध्ये चीफ ग्राउंड इंजिनीअर म्हणून काम पहिले. १ ल्या प्रभात पुरस्कारांच्या वेळी त्यांना ‘प्रभात चे शिलेदार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.