Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरून राष्ट्रवादी आणि मनसे असा वादंग…

Date:

जिजामातेचे चारित्र्यहनन करणाऱ्यांना पाठीशी घालण्याची नीती आमची नाही-जितेंद्र आव्हाड

ठाणे -शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरून राष्ट्रवादी आणि मनसे असा वादंग निर्माण होवू पाहतो आहे . काल मनसेचे राज ठाकरे यांनी पुरंदरे यांच्यावरून ‘जाणता राजा ‘ शरद पवार आणि ठाण्यातली वळवळ असे संबोधत  जितेंद्र आव्हाड यांच्यावर आपल्या भाषणातून निशाना  साधला होता . याबद्दल …
जिजामातेचे चारित्र्यहनन करणाऱ्यांना पाठीशी घालण्याची नीती आमची नाही , प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीलेले शिवचरित्र आमच्या मनाला भावले. त्यांनी लिहीलेले शिवचरित्र वाचून माझ्यासारखे कार्यकर्ते घडले. पुरोगामी महाराष्ट्रात आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार पुढे घेवून जात आहोत. पण राज ठाकरे पुरंदरेच्या मागे जाताना प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा विसरत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
राज ठाकरे यांनी काल ठाण्यात झालेल्या भाषणात आव्हाड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्याला आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. पुरंदरेंच्या पुस्तकात महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राष्ट्रमाता जिजामातेचे चारित्र्यहनन केले आहे. चुकीचा इतिहास मांडण्याचे प्रयत्न पुरंदरेंच्या पुस्तकात करण्यात आला आहे. आम्ही त्याला विरोध करायचा नाही का असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा इतिहास वाचण्यापेक्षा वेळ काढून आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेला इतिहास वाचावा, असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिला आहे. पुरंदरेच्या पुस्तकाचा राज ठाकरेंवर प्रभाव पडतोय व त्यांना प्रबोधनकार ठाकरेंच्या वारशाचा विसर पडतोय हा महाराष्ट्रासाठी दुर्दैवी योग असल्याची टीकाही अाव्हाड यांनी यावेळी केली.
-दरम्यान

काल राज ठाकरे यांनी भाजप -राष्ट्रवादी- एम आय एम चे ओ वे सी यांच्या सह न्यायाधीशांवरही टीप्पणी केली होती
‘आजच्या सरकारला या देशात निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडवायच्या आहेत. यासाठी याकूबच्या फाशीच्या तमाशा बनवला गेला. हे सर्व मतांचे उद्योग आहेत. पण खबरदार, जर या महाराष्ट्रात काही वेडेवाकडे घडवण्याचा प्रयत्न केलात तर राज ठाकरेंशी गाठ आहे. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढीन,’ अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी साेमवारी भाजपच्या केंद्र व राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत कित्येक महिन्यांचे ‘मौन’ सोडले. उद्धव ठाकरेंशी भेट, महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे राजकारण, याकूबची फाशी, नरेंद्र मोदींचे मौन आणि न्यायालयांची भूमिका अशा विविध विषयांवर त्यांनी परखड मते मांडली.विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून शांत असलेल्या राज ठाकरेंनी साेमवारी ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात राज्यातील राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आपल्या भेटींबद्दलच्या कथित बातम्यांबद्दल खुलासा केला. ‘इंदूरचे भय्यू महाराज यांच्या आमंत्रणावरून आपण तिकडे गेलो होतो, असा तर्क लावत भेटीच्या या बातम्या पुरवल्या गेल्या,’ असे सांगताना भाजपला घाबरवण्यासाठी शिवसेनेनेच या बातम्या पसरवल्याचा अप्रत्यक्ष आराेप राज ठाकरे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस चांगला माणूस असल्याचे काैतुक करतानाच त्यांच्या सरकारवर मात्र ठाकरेंनी हल्लाबाेल केला. या सरकारच्या येण्याने राज्यात काही फारसा बदल झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. ‘शेतकरी आत्महत्या, सिंचन, टोल, दुष्काळ हे जुनेच प्रश्न आजही कायम आहेत,’ हे सांगतानाच ‘या सरकारची इतक्या लवकर भांडाफोड होईल वाटले नव्हते’, असा चिमटा काढत राज यांनी तावडे आणि पंकजा मुंडे या मंत्र्यांनाही लक्ष्य केले. राज्य सरकारच्या एका खात्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी शंभर कोटींची लाच खाल्ल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘मन की बात करणारे मोदी आता शांत का?’ असा सवाल करत राज यांनी मोदी आणि शहा या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांवरही शरसंधान केले.
राष्ट्रवादीमुळेच जातीयवाद वाढला
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून चाललेल्या राजकारणाचा निषेध करत राज ठाकरे यांनी जितेंद्र अाव्हाड आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली. ‘राष्ट्रवादी नावाचा पक्ष जेव्हापासून जन्माला आला तेव्हापासून राज्यात जातीयवादाचे विष पसरू लागले अाहे,’ असा थेट आराेप करत राज ठाकरे यांनी ‘एमअायएम’चे अाेवेसी बंधूंनाही लक्ष्य केले.
जे काँग्रेस केले तेच भाजपही करतेय
परप्रांतीयांच्या नावावर बांगलादेशी नागरिकांना राज्यात प्रवेश दिला जात आहे. या सगळ्यांना पोसण्याचे काम भाजप करत अाहे. खोटी आधार कार्डे वाटताना मनसे कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला पकडल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. पूर्वी जे काँग्रेस करायची, तेच आता हे पार्टी विथ डिफरन्स म्हणणारे भाजपवाले करताहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
मांसाहार झेपत नसेल तर करू नका
मांसाहाराच्या मुद्द्यावरून राज यांनी गुजराती समाजावर शरसंधान केले. ‘मांसाहार आपल्याला नाही झेपत तर गप्प बसा, पण मांसाहार करणाऱ्यांना विरोध करणे ही दहशत मुंबईत खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.
न्यायालयाच्या भूमिकेवरही टीका
‘न्यायालये एरवी न्यायासाठी सुट्यांची कारणे देतात अाणि याकूब मेमनसाठी पहाटे तीन वाजता न्यायालये उघडतात, हे दुर्दैवी अाहे,’ हे सांगतानाच महेश भट, सलमान, नसिरुद्दीन शहा, राम जेठमलानी यांनीही याकूबच्या फाशीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर राज यांनी नाराजी व्यक्त केली. याकूबच्या केसला २२ वर्षे आणि गणपती मंडपांच्या केसेस मात्र एका फटक्यात निकाली काढल्या जातात,’ याकडेही लक्ष वेधले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...