पुणे ः राष्ट्रीय कला अकादमी आणि सुयोग मित्र मंडळाने दीपावलीनिमित्त कैलास स्मशानभूमीत केलेल्या दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला. ढोले-पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत स्मशानभूमीत व स्वच्छता विभागात काम करणार्या ३० कर्मचार्यांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. स्थानिक नगरसेविका लता राजगुरु, महापालिकेचे सह-आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सहायक आयुक्त संजय गावडे, आरोग्य निरीक्षिका नीलिमा काकडे, विभागीय आरोग्य निरीक्षक राजेंद्र बहिरट यांची प्रमुख उपस्थिती होती. मंदार रांजेकर, सागर राऊत, गणेश माने, मंगेश तडके, मिलिंद येद्रे, विजय बढे, अक्षय माने यांनी संयोजन केले.




