Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विषाखापट्टनम् क‍िनार्‍यावर आदळले ‘हुदहुद’ -दोघांचा बळी

Date:

नवी दिल्ली-आज (रविवार) सकाळी ताशी 195 किलोमीटर वेगाने ‘हुदहुद’ चक्रीवादळ विशाखापट्टणमला धडकले. सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसामुळे विशाखापट्‌टनममध्ये अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. पावसाने दोन जणांचा बळी घेतला आहे.लोकांची धावपळ उडाली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘हुदहुद’ हे चक्रीवादळाने आज (रविवार) सकाळी 11 वाजेच्या सुमारास विशाखापट्‌टनम जवळील कैलासगिरीमध्ये दस्तक दिली. काही तासांतच हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशमधील विशाखापट्‌टनमच्या किनार्‍यापट्‍टीला धडकण्याची शक्यता आहे. विशाखापट्टनममध्ये सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.
चक्रीवादळाचा आवाका 40 किलोमीटरपर्यंत पसरला आहे. विशाखापट्टनमच्या किनार्‍यावर चक्रीवादळ धडकेल तेव्हा त्याचा वेग ताशी 180 किलोमीटर असेल. तसेच समुद्रात 30 मीटर ऊंचीला लाटा उसळू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होण्‍याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आंध्र प्रदेश आणि ओडिशात अनेक शहरात ताशी 140 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्रात 15 ते 20 फूट ऊंचीच्या लाटा उसळल्या आहेत. त्यामुळे‍ किनार्‍यावरील लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेश, ओडिशात एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यातील जवळपास दोन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. आपात्कालिन स्थितीत करण्‍यात आलेल्या उपाययोजनेचाही मोदींनी आढावा घेतला.
तत्पूर्वी वादळाच्या तडाख्याच्या भीतीने आंध्र प्रदेश आणि ओडिशातील सुमारे पाच लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. आठ लाख लोकांना एसएमएस पाठवून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर भुवनेश्वरहून सुटणार्‍या 40 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने 75 रेल्वेगाड्या रद्द वा त्यांचे मार्ग बदलण्याची तयारी केलेली आहे.
हवामान खात्यानुसार, दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्रच्या किनारपट्टी भागाला वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस होण्याचा धोका आहे. विद्युत पुरवठा ठप्प होऊ शकतो. रेल्वे आणि रस्ते वाहतूकही ठप्प होण्याची भीती आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी वादळ विशाखापट्टणमहून 250, तर ओडिशाच्या गोपालपूरहून 350 किलोमीटरवर होते.
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, श्रीकाकुलम, पश्चिम गोदावरी, विशाखापट्टणम, विजियानगरमला तर ओडिशामधील कोरापूट, मलकानगिरी, नबरंगपूर, रायगडा, गजपती, गंजमला वादळाचा धोका निर्माण झाला आहे.
एनडीआरएफचे जवान आंध्र प्रदेश, ओडिशात तैनात आहेत.
आठ लाख लोकांना एसएमएस पाठवून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर भुवनेश्वरहून सुटणार्‍या 40 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने 75 रेल्वेगाड्या रद्द वा त्यांचे मार्ग बदलण्याची तयारी केलेली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...