नवी दिल्ली –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवामुळे विमान दीड तास रखडले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्यामुळे विमानाला झालेला उशीर या दोन्ही प्रकरणांवर पंतप्रधान कार्यालयाने नागरी उड्डाण मंत्रालयाकडे अहवाल मागवला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेला जाणारे विमान रोखून धरल्याचा आरोप केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यथित झाले असून मी विमान रोखून धरल्याचा प्रकार दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.
मीडियात विमान रोखून धरल्याच्या घटनेवर जोरदार चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयानेही याची देखील घेतली आहे. एअर इंडियाच्या विमानांना व्हिआयपींमुळे उशीर झाल्याच्या घटना नुकत्याच समोर आल्याअसून त्याचा अहवाल नागरी उड्डयान मंत्रालयाकडून मागवण्यात आला आहे, असे सरकारच्या मुख्य प्रवक्त्यांकडून सांगण्यात आल्याचे टाइम्स नाऊने ट्विट केले आहे. तसचे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झालेल्या घटनांची माहिती आम्ही घेत आहोत, असे नागरी उड्डयान मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांनी यांनी दिल्लीत सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. रवाना होण्यापूर्वी त्यांच्या ताफ्यातील एका अधिकाऱ्याच्या पारपत्राबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे तब्बल एक तासापेक्षा अधिक काळ विमान रोखून धरल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान या साऱ्या आरोपांमुळे व्यथित होऊन फडणवीस यांनी आज ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये त्यांनी “मी वेळेत विमानात बसलो होतो. मागील आणि पुढील प्रवाशी याला साक्षीदार आहेत. मी वेळेत शांतपणे माझ्या जागी बसलो होतो.‘ असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच हे आता पुरे झाले मी भारतात परतल्यावर या प्रकरणी बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहे‘ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
विमान रोखून धरले ? मुख्यमंत्री व्यथीत तर पंतप्रधान कार्यालयाने मागविला अहवाल
Date:

