जुहू येथील मॅरिएट हॉटेल येथे राज्यपाल चे विद्यासागरराव यांच्या हस्ते “यपटिव्ही बजार” ॲप्सचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. भारतीय चित्रपट निर्मात्यांना त्यांची प्रतिमा दर्शविण्याकरीता यपटिव्ही एक विश्वसनीय व सहाय्यभूत माध्यम असून, महाराष्ट्र राज्य या नवीन उपक्रमाचे समर्थन करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या वेळी यपटिव्हीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी उदय रेड्डी, सिनेअभिनेता अभिषेक बच्चन, चित्रपट निर्माता सुधीर मिश्रा आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणले, आजच्या डिजीटल युगात स्वतंत्र सर्जनशील निर्मात्यांना यपटिव्ही बाजारने एक नवीन माध्यम निर्माण करुन दिले आहे. या उपक्रमाला त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
यपटिव्ही बजारचे संस्थापक सीईओ रेड्डी या ॲप्सचे सादरीकरण करतांना म्हणाले, शिक्षण, लघुपट, वेबसिरीज व ट्रेलर इत्यादींसारख्या विविध शैलीमधील संग्रहीत प्रिमिअम, व्हिडिओ, कन्टेंन्टला यपटिव्ही सादर करेल, यपटिव्ही बजार कन्टेंन्ट डेव्हलपर्सला सक्षम करण्यासाठी आणि मुद्रीकरण करण्यासाठी परीपूर्ण माध्यम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.