पुणे : भारत सरकारच्या पर्यावरण विभागा तर्फे घेण्यात येणार्या स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत रोझरी स्कूल तर्फे नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे व पुण्याला प्लॅस्टिक प्रदूषणातून मुक्त करणे या उद्देशाने ही मोहिम राबविण्यात आली होती.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना कॅप्स,ग्लोव्हज्,मास्क आणि इको फ्रेंडली वस्तुंच्या वापराला प्रोत्साहन म्हणून कापडी बॅग्स देण्यात आल्या. या स्वच्छता अभियानामध्ये इयत्ता 9 वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्वच्छता मोहिम सातारा रस्ता येथील राव नर्सिंग होम शेजारील मोकळ्या जागेपासून सुरू झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या व प्लॅस्टिक वापर टाळण्यासंदर्भात शपथ घेतली.

