राष्ट्रवादी काँग्रेसचे कचरा हटविण्यासाठी आंदोलन

Date:

पुणे :
कचरा प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी अनेकदा पालिका अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करूनही अपेक्षित सुधारणा न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज पालिका आयुक्त कुणाल कुमार साठीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना दिले आणि पालिका अधिकार्‍यांना ‘व्हॉटस् अप’ द्वारा पुण्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांनी कचर्‍याच्या ढिगाचे फोटो पाठवले.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी या अभिनव ‘व्हॉटस् अप आंदोलना’चे नेतृत्व केले. या आंदोलनामध्ये अंकुश काकडे, अशोक राठी, बंडू केमसे, दीपक मानकर, बाळासाहेब बोडके, अ‍ॅड.म.वि.अकोलकर, विनायक हणमघर, ज्ञानेश्‍वर शिंदे, बबलू जाधव, नाना नलावडे, मंगेश तुपे, गणेश माथवड, शैलेश बडदे, गणेश नलावडे, मनाली भिलारे, काजल मिसाळ, रूपाली चाकणकर, डॉ. सुनीता मोरे, डॉ. काळे, संजय गाडे, योगेश वराडे आदी सहभागी झाले होते.
प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या परिसरातील कचरा पसरलेले 10 फोटो काढून आणण्यास सांगण्यात आले होते. ते अधिकार्‍यांना व्हॉटस् अपद्वारे देण्यात आले.
‘कचरा समस्या अक्राळ विक्राळ झाली असून, पुणे शहराचे रूपांतर ‘गार्बेज सिटी’मध्ये होऊ लागले आहे.’ असे या निवेदनात म्हटले आहे.
‘कचर्‍याचा नागरिकांच्या आरोग्याला धोका पोचत असून, राष्ट्रवादी काँग्रेस याबाबतीत सतत आवाज उठवत आहे. बैठका घेऊन अधिकार्‍यांचे लक्ष वेधले गेले होते. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी पुणेकरांचा कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहर स्वच्छ व सुंदर राहील याबाबत कायम कार्यरत व आग्रही राहीले आहे, त्यामुळे पुणेकर नागरिकांना  शहरातील वाढत्या कचर्‍याच्या प्रश्‍नासंदर्भात प्रशासनाने दखल घेऊन त्वरीत कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिले होते. तरीही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला हे आंदोलन करावे लागले, ’ असे आंदोलना दरम्यान खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण बोलताना म्हणाल्या.
रोज अत्यंत व्यवस्थित रस्ते झाडले जातात, अशा कचर्‍याचे एकत्रिकरण व्यवस्थित होत नाही. ‘कंटेनरमुक्त प्रभाग’ करताना वर्गीकृत कचरा घराघरातुन उचलला जावा त्यावर देखरेख व्हावी. प्रक्रिया व्हावी, कॉम्पॅक्टर्स उपयोग करावा नदीपात्रात कचरा टाकले जाऊ नये. असे या निवेदनात म्हटले आहे. ‘स्वच्छ’, ‘जनवाणी’सारख्या संस्था कचरा समस्येवर पालिकेबरोर काम करत आहेत. पण त्यात योग्य समन्वय होतो का? योग्य परिणाम साधला जातो का हे पाहिले पाहिजे.
रविवारची स्वच्छता होते का पाहिली पाहिजे. घन कचरा विभागाला पुरेशी वाहने, कर्मचारी आहेत का हे पाहिले पाहिजे. कचरा उचलण्याचे नियोजन केले पाहिजे. पालिकेतील अधिकार्‍यांनी कचरा समस्येसाठी जबाबदारीने काम केले पाहिजे.
बांधकामाचा राडारोडा नदीपात्रात आणि इतरत्र टाकण्यास मज्जाव करावा. पोस्टर्स लावून शहराचे विद्रुपीकरण होत आहे, त्यावर निर्बंध आणावेत. ‘स्मार्ट सिटी’ करताना या सर्व बाबतीत पालिका अधिकार्‍यांकडे प्रेरणा आणि उपाययोजनांची परिणामकारकता यात उणीव भासत आहे. सणासुदीचे दिवस असताना आणि एरवीही शहर स्वच्छ राहीले पाहिजे ही भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
‘आरोग्य खात्याचा धिक्कार असो !, आरोग्य खाते आणि प्रशासनाचा धिक्कार आणि निषेध असो !’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दील्या.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...