पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेला आज (दि. 15) सुरुवात झाली. स्पर्धा दि. 21 जानेवारीपर्यंत भरत नाट्य मंदिरात होणार आहे. राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत 20 शाळांचा सहभाग असून एस. पी. एम. इंग्लिश स्कूलने सादर केलेल्या ‘झिलमिल’ या एकांकिकेने स्पर्धेचा पडदा उघडला. त्यानंतर भारतीय विद्या भवन, परांजपे विद्या मंदिराने ‘माकी मिका 2’ ही एकांकिका सादर केली.
राज नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे वेळापत्रक
दि. 17 : सायंकाळी 5 ते 8
नू. म. वि. मुलींची शाळा (बिहाईंड द ट्रूथ), ज्ञान प्रबोधिनी, पुणे (सुनियो), व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल (केस स्टडी).
दि. 18 : सायंकाळी 5 ते 8
एम. व्ही. एम. रामचंद्र राठी मराठी माध्यमिक विद्यालय (इको फ्रेन्डली), रॅडक्लिफ स्कूल (जंबा बुंबा बो), सेवासदन इंग्लिश मिडियम स्कूल (प्लॅन चीट),
दि. 19 : दुपारी 1 ते 4
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग (माय सुपर हिरो), आर्यन्स स्कूल, भिलारेवाडी (गोष्टींची गोष्ट), आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे (आदिम).
सायंकाळी 5 ते 8
मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर, पुणे (मायबोलीत रंग), श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय (नकुशा), जी. के. गुरुकुल (द लेसन).
दि. 20 : सायंकाळी 5 ते 8
श्री शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (आखिर अभिमन्यूने चक्रव्यूह तोडलेच), मानव्य (देवाला पत्र), बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल (स्वयंपूर्ण).
दि. 21 : सायंकाळी 5 ते 8
डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल, गणेशनगर (गेम ओव्हर), भारतीय विद्या भवन, सुलोचना नातू विद्या मंदिर (ए फॉर), सिल्व्हर क्रेस्ट स्कूल (अटक मटक वेगळीच चटक).
25ला पारितोषिक वितरण समारंभ
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.