पुणे: रविवार पेठ येथे घरगुती वापरासाठी सुरु असलेली 52 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली असून याप्रकरणी संबंधीत घरगुती ग्राहकाविरुद्ध मंगळवारी (दि. 12) पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की रास्तापेठ विभाग अंतर्गत रविवार पेठ येथील प्रशांत दीपक ओसवाल यांच्या घरातील वीजयंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात मीटरमध्ये वीजवापराची नोंद होऊ नये यासाठी थेट वीजपुरवठ्याद्वारे वीजचोरी सुरु असल्याचे दिसून आले व एकूण 4977 युनिटची म्हणजे 52 हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
या वीजचोरीप्रकरणी प्रशांत दीपक ओसवाल विरुद्ध रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.